Suvendu Adhikari - Mamata Banerjee
Suvendu Adhikari - Mamata Banerjee 
सरकारनामा

ममता बॅनर्जींचे 'खेला होबे'; सुवेंदू अधिकारींचा केला पराभव

वृत्तसंस्था

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांनी नंदीग्राम मतदारसंघात आपले पूर्वीचे सहकारी सुवेंदू अधिकारी Suvendu Adhikar यांचा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली आहे. ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेसही TMC विजयाची घोडदौड करत असून पश्चिम बंगालमध्ये त्यांची एकहाती सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. Trinamool Leader Mamata Banerjee Wins Nandigram Seat In West Bengal Elections

आज पश्चिम बंगालच्या West Bengal निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली तेव्हा ममता बॅनर्जी या मागे पडत असल्याचे चित्र होते. मात्र, नंतर त्यांचे पारडे जड होत गेले व अखेर १२०० मतांनी त्या विजयी झाल्या. सुवेंदू अधिकारी हे ममता यांचा उजवा हात समजले जायचे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये BJP प्रवेश केला. ममता बॅनर्जींना ५० हजार मतांनी हरवलं नाही तर मी राजकारण सोडून देईन, अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. 

याच नंदीग्राम Nandigram मतदारसंघानं ममता बॅनर्जींना २०११ मध्ये विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथे मोठ्या सभा घेतल्या. भाजपने निवडणुकीआधी तृणमूलचे अनेक नेते फोडून ममता बॅनर्जींना धक्का देण्याचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत. यावेळी पश्चिम बंगालमधली जनता पुन्हा एकदा त्यांच्याच हाती सत्तेच्या चाव्या सोपवेल हे आता स्पष्ट झाले आहे.. Trinamool Leader Mamata Banerjee Wins Nandigram Seat In West Bengal Elections

पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे. ''ममता बॅनर्जी आपल्या विलक्षण विजयी घोडदौडीबाबत आपले अभिनंदन. जनतेच्या कल्याणासाठी आपण सर्वजण एकत्र काम करु व कोरोना महामारीच्या या संकटावर एकत्रित मात करु,'' असे पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivajirao Adhalrao Patil | "कोल्हेंनी भाजपचं दार ठोठावलं होतं", काय म्हणाले आढळराव पाटील?

Pat Cummins Statement: आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? पॅट कमिन्सने विराट, रोहित नव्हे तर या खेळाडूचं घेतलं नाव

OTT Release This Weekend : ‘या’ आठवड्यात पाहता येणार क्राईम, ड्रामा, थ्रिलर चित्रपट आणि वेबसीरीज, जाणून घ्या यादी

Parenting Tips: उन्हाळ्यात मुलांना स्विमिंग क्लास लावण्याचा विचार करताय ? मग 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Gautami Deshpande At Sangeet: गळ्यात हार अन् कानात झुमका,लगीन सोहळ्यासाठी सजली गौतमी

SCROLL FOR NEXT