ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या मुलांना काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत.
प्रत्येक पालक आपल्या मुलांना विविध क्लास लावत असतात,त्यामध्ये एक स्विमिंगचाही क्लास अनेक पालक आपल्या मुलांसाठी लावतात.
मात्र स्विमिंग क्लास लावण्याआधी खाली दिलेल्या गोष्टींची काळजी प्रत्येक पालकांनी घेतली पाहिजे.
मुलांना स्विमिंग क्लास लावताना मुलांचे हेल्थ चेकअप करुन घेणे गरजेचे आहे.
स्विमिंग क्लास लावताना मुलांकडे महत्त्वाच्या वेळेसाठी फर्स्ट एड किट असणे आवश्यक आहे.
ज्या ठिकाणी मुलांना स्विमिंग क्लास लावणार आहे तेथील स्विमिंग पुलसंबंधित सर्व माहिती मुलांना सांगणे गरजेचे आहे.
मुलं जेव्हा स्विमिंग क्लासला गेल्यानंतर त्याचा पाण्याशी संबंध येणार त्यामुळे मुलांवर पूर्णवेळ लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.