Samadhan Awatade
Samadhan Awatade 
सरकारनामा

राष्ट्रवादीला धक्का- पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंचा विजय

भारत नागणे

पंढरपूर : साऱ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा  Pandharupur Mangalwedha पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे विजयी झाले. आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३७१६ मतांनी पराभव केला. सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेल्या भालकेंना पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी टिकवता आली नाही. Pandharpur Mangalwedha Election BJP Samadhan Awatade Defeated NCP Bhagirath Bhalke

पंढरपूरचे Pandharpur राष्ट्रवादीचे NCP आमदार भारत भालके यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या जागेवर आज आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे BJP उमेदवार समाधान आवताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील व अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी ही आपली शक्ती पणाला लावली होती. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीसाठी Maha Vikas Aghadi प्रतिष्ठेची होती.

पंढरपूरची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची  केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह Ajit Pawar अनेक मंत्री आणि आमदार भालके यांच्या प्रचारात उतरले होते. Pandharpur Mangalwedha Election BJP Samadhan Awatade Defeated NCP Bhagirath Bhalke

भाजपकडून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षनिरीक्षक बाळा भेगडे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आवताडेंच्या विजयासाठी मोठी ताकद लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ५२४ मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 33.91 % मतदान

Rajasthan Crime: विवाहित महिलेवर २० वर्षांपासून अत्याचार; सासरा अन् दिरासोबत ठेवायला लावले शारीरिक संबंध

Viral Video : गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गच्चीवर गेला; समोरून मुलीचे बाबा आले अन्..., पाहा VIDEO

Drinking Cold Water: फ्रिजमधलं थंडगार पाणी आरोग्यासाठी चांगले की वाईट?

Rohit Pawar: मतांसाठी पैशांचं वाटप? बोगस मतदानही? रोहित पवारांचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT