सरकारनामा

मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांची 'त्याला' पसंती..

सकाळ न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सध्या हा एकच प्रश्न सर्वत्र प्रामुख्याने विचारला जातोय. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटता सुटत नाहीये. शिवसेना भाजप वाद, त्यावर येणारी विधानं यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. अशातच आता महाराष्ट्रातील मोठे नेते 'शरद पवार' यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एका नावाला पसंती दिली आहे.

शरद पवार हे महाराष्ट्रातील मुरब्बी नेते, त्यांना राजकारणातील वारे कुठे फिरतायत याची लगेच खबर लागते असं म्हटलं जातं. अशातच, खुद्द शरद पवारांनी ज्याला पसंती दिलीये ती व्यक्ती आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्यातही, आता हे नवं समीकरण सर्वांना पटणार का? हा देखील तुम्ही विचार करत असाल. आता शरद पवार यांनी ओंकारला मुख्यमंत्री करण्याची ग्वाही दिलीये. 

'महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झालेत, त्यातील सर्वात युवा मुख्यमंत्री हा राज्यातून आणि देशातून बारामतीने दिला आहे. त्यामुळे भविष्यात ओंकारसुद्धा मुख्यमंत्री होऊच शकतो." असं त्याठिकाणी उपस्थित सुप्रिया सुळे देखील म्हणाल्यात. 

किस्सा आहे तरी काय ? 
'झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' रिऍलिटी शो चा महाअंतिम सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचं चित्रीकरण बारामतीमधील गदिमा सभागृहात पार पडलं. या कार्यक्रमाच्या एका ऍक्टमध्ये बालगायक ओंकारने शरद पवारांकडे मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली.   

"बारामतीच्या राजकीय हवामानाने मलाही स्फुरण चढलंय, मी आज नुसत्या राजकारणी नेत्याच्या वेशात नाही तर मलाही मुख्यमंत्री व्ह्यचंय" असं, ओंकारने निवेदिका मृण्मयी देशपांडे हिला सांगितले. बरं ओंकार एवढ्यावरच थांबला नाही "मी मुख्यमंत्री होणार, पण मला मुख्यमंत्री बनवणार ते पवार साहेब'' म्हणत त्याने थेट शरद पवारांना "कराल ना हो मला मुख्यमंत्री?" असा प्रश्न विचरला. यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

दरम्यान मृण्मयी देशपांडेने यातला कोणताच भाग का स्क्रिप्ट भाग नसल्याचं सांगितलं. यावर शरद पवारांनी 'बारामतीकरांना कोणीही काहीही सांगायची गरज नसते' असं म्हणत खुद्द शरद पवार यांनी ओंकारला मुख्यमंत्री करण्याची ग्वाही दिली.

WebTitle :sharad pawar seconds this persons name as cm candidate of maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत शरद पवारांनी दम भरला

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

SCROLL FOR NEXT