सरकारनामा

नाशिक शिवसेनेचे 30 नगरसेवक बंडाच्या तयारीत?

सरकारनामा

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या नियुक्तींतून भाजपला घेरणाऱ्या शिवसेनेला स्वतःच्याच नगरसेवकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार ठराविक लोकांनाच पदे मिळत असल्याने असंतोषाचा भडका उडाला आहे. तीस नगरसेवकांनी वेगळी बैठक घेऊन खलबते केली. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात बंडाची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपला घेरणारी शिवसेना 'बॅकफूट' वर जाण्याची चिन्हे आहेत.

तीन वर्षांपासून महापालिकेत एकसंध असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेत ठराविक चौकटीत पदांचे वाटप केले जाते, असा आरोप करत 30 हून अधिक नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी सुरू केली आहे. आपली खदखद नेमकी कोणाकडे, व्यक्त करायची याचा निर्णय घेण्यासाठी एका नगरसेवकाच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी बैठक झाली. बैठकीत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व गटनेते विलास शिंदे यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला.

MySarkarnama@MySarkarnama

रितेश वाट पहात आहेत विलासरावांच्या चित्रपटासाठी चांगल्या स्क्रीप्टचीhttps://www.sarkarnama.in/movie-vilasrao-life-challenge-say-ritesh-deshmukh-50066 … @INCMumbai @MaharashtraPMC @Riteishd #VilasraoDeshmukh

''महापालिकेत बोरस्ते, बडगुजर, शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणालाच पदे दिली जात नाहीत. सत्यभामा गाडेकर यांचे नाव स्थायी समितीवर ऐनवेळी आले, त्यातही या त्रिकुटाच्या मर्जीतूनच गाडेकर यांचे नाव आले. त्यापूर्वी शिवसेनेत जे काही निर्णय झाले, त्यात नगरसेवकांना विचारात न घेता परस्पर एकाधिकारशाहीने घेतले गेले. पक्षाचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आल्यास त्यांना भेटण्यासाठी स्थानिक नेत्यांचे अडथळे पार पडावे लागतात. महत्त्वाची पदे बोरस्ते, बडगुजर, शिंदे यांच्याकडेच आहेत. महासभेत लक्षवेधी सूचना मांडता येत नाही. साधे निवेदन द्यायचे असले तरी परवानगी घ्यावी लागते. महासभेत मोकळेपणाने भूमिका मांडता येत नाही. बोरस्ते, बडगुजर यांचे एकमेकांमध्ये भांडण दिसत असले तरी आतून दोघेही एकच आहेत. नगरसेवकांची दिशाभूल केली जाते. महापौर, उपमहापौर निवडणुकीत सत्तेची गणिते जुळून आली असताना एक तास आधी काय घडले, याची माहिती अद्यापही नगरसेवकांना का दिली जात नाही,''अशा शिवसेना नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. 

स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या मुद्यावरून आता खदखद बाहेर पडत असून, या खदखदीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बैठक झाली. बैठकीला नऊ ते दहा नगरसेवक उपस्थित असले तरी 30 ते 32 नगरसेवकांनी बोरस्ते, बडगुजर व शिंदे यांच्या विरोधात मोट बांधल्याचे समजते.

Web Title 30 corporater of Nashik Shiv Sena ready for rebellion?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैशाली दरेकरांच्या रॅलीत विवेक खामकरांची दांडी, ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', शिंदे गटाच्या वाटेवर?

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळालं स्थान

Today's Marathi News Live : मुंबईत आजही उष्णतेची लाट, नवी मुंबईचा पारा ४२ अंशांवर

Washim Temperature : एप्रिलअखेर वाशीम जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार!

Ice Water Facial : आईस वॉटर फेशियल करण्याची योग्य पद्धत

SCROLL FOR NEXT