Madras High Court Upset over Election commission over Coroan Wave
Madras High Court Upset over Election commission over Coroan Wave 
सरकारनामा

निवडणूक आयोगावरच खुनाचा गुन्हा हवा...मद्रास उच्च न्यायालयाचा शेरा

वृत्तसंस्था

चेन्नई : देशात पसरलेल्या कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेबद्दल Second Wave मद्रास उच्च न्यायलयाने Madras High Court तीव्र चिंता व्यक्त केली असून या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी निवडणूक आयोगच Election Commission जबाबदार असल्याचे ताशेरे ओढले आहेत. वास्तविक या लाटेत झालेल्या मृत्यूंबद्दल Deaths निवडणूक आयोगावर खुनाचा Murder गुन्हा दाखल करायला हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. जर कोरोना रोखण्याची ठोस उपाययोजना आमच्यासमोर सादर झाली नाही, तर येत्या दोन मे रोजी होणारी मतमोजणी Election Counting थांबवावी लागेल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. Madras High Court Held Election Commission Responsible for Corona Second Wave

देशात पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रिया झाली. त्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभांना प्रचंड गर्दी झाली होती. या राज्यातले कोरोनाचे आकडे समोर आले नसली तरी देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कुठेतरी या निवडणुकाच कोरोना वाढीला कारणीभूत ठरल्या आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महाराष्ट्रातही Maharashtra वर्षाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे Social Distancing निकष धुडकावले गेले होते. त्यानंतरच्या काळात राज्यातही कोरोनाची लाट अक्राळविक्राळपणे पसरली. आज देशात सर्वच राज्यांत कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अनेक राज्यांमध्ये लाॅकडाऊन, Lock Down कडक निर्बंध लाऊनही कोरोनाची लाट आटोक्यात येत नाही, अशी स्थिती आहे. याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. Madras High Court Held Election Commission Responsible for Corona Second Wave

दाखल झालेल्या एका याचिकेवर बोलताना न्यायालयाने निवडणूक आयोगावर कडक ताशेरे ओढले. राजकीय पक्षांना निवडणूक प्रचार सभा घेण्यापासून निवडणूक आयोग रोखू शकला नाही, असे सांगत कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेला केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे, असा शेरा मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी यांनी मारला. निवडणूक आयोगावर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे सांगतानाच येत्या २ मे रोजी होणारी मतमोजणी थांबवावी लागेल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

Goa Airport News Today: गोवा विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी आल्यानं खळबळ

Benifits of Buttermilk: अ‍ॅसिडिटी, गॅस सारख्या समस्यांसाठी 'या' पेयाचे सेवन ठरेल गुणकारी

Today's Marathi News Live : मालवणी दारुकांड प्रकरणी ४ आरोपी दोषी, १० जणांची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT