Uddhav Thackeray 
सरकारनामा

काय सांगणार आज मुख्यमंत्री; लाॅकडाऊन वाढ की निर्बंधातून सवलत?

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यातल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता सोशल मिडियावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांची मुदत उद्या (ता. ३१ मे) संपत आहे. आता मुख्यमंत्री राज्यातले निर्बंध किंवा लाॅकडाऊन वाढविणार का निर्बंधातून सवलती मिळणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. CM Uddhav Thackeray to Address state to night

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले. त्याची मुदत दोन वेळा वाढविण्यात आली. आता राज्यात काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रेमडिसीवीर इंजेक्शनची कमतरता, आॅक्सिजनची कमतरता यामुळे मृत्यूदर वाढला होता. पण आता त्यावर बऱ्याचशा प्रमाणात मात करण्यात आली आहे. राज्यात आॅक्सिजनचा साठा पुरेसा आहे. तसेच रेमडिसीवीरच्या वापराबाबतही आयसीएमआरनं काही निकष दिले आहेत. त्यामुळे या पातळ्यांवर राज्याला दिलासा मिळाला आहे.

हे देखिल पहा

महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 22 लाख 20 हजार 673 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.29 मे 2021 रोजी  2,99,571 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्यात काल 20295 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व काल नवीन 31964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

एकूण 5339838  रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 276573  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे. ही माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच दिली आहे. CM Uddhav Thackeray to Address state to night

राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतरही सरसकट उठवता येणार नाही मात्र, काही ठिकाणी जिथे रुग्णसंख्या कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे राजेश टोपे यांनी बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले होते. मुख्यमंत्र्यांसोबत सर्व मंत्र्यांचे लॉकडाऊन लगेच काढणे शक्य नाही, यावर एकमत झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यामुळे आता येत्या १ जून पासून काय स्थिती राहिल याकडे नागरिकांचे लक्ष आहे.  
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रेमाचं जाळं, ब्लॅकमेलिंगचा फास, अमरावतीत 180 मुलींचं लैगिक शोषण

Tueday Horoscope: आज तुमचे जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

SCROLL FOR NEXT