Janmashtami 2022 Saam TV
धार्मिक

Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे ? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व

जाणून घ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त

कोमल दामुद्रे

Janmashtami 2022 : हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते.

मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाच्या बाळलिलेची म्हणजेच लड्डू गोपाळाची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या बाळकृष्णाच्या पूजेचे विशेष महत्त्व असून मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. श्रावणातला हा सगळ्यात मोठा सण आहे.

जन्माष्टमीची पूजा प्रामुख्याने मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे प्रमुख्याने केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

असे मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण सर्व मनोकामना पूर्ण करतात. यावर्षी जन्माष्टमीचा सण कधी साजरा केला जाईल आणि त्याचे महत्त्व काय आहे.

जन्माष्टमी २०२२ तारीख आणि वेळ (Time)

- यंदा कृष्ण जन्माष्टमी १८ ऑगस्ट २०२२, गुरुवारी साजरी केली जाईल.

- १८ ऑगस्ट रोजी पूजेचा शुभ मुहूर्त १२.२० ते ०१.०५ पर्यंत असेल आणि त्याचा कालावधी सुमारे ४५ मिनिटे असेल.

- पारयणाची वेळ - १९ ऑगस्टला रात्री १०. ५९ मिनिटांनंतर सुरु करु शकतो.

- या वर्षी रोहिणी नक्षत्र २० ऑगस्टच्या रात्री १.५३ वाजून ५३ मिनिटांनी दिसत असल्याने या वर्षी रोहिणी नक्षत्राशिवाय जन्माष्टमी सण साजरा होणार आहे. यंदा हे व्रत १९ ऑगस्टला सोडायचे आहे.

- परंतु, श्रावण कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी १८ ऑगस्टला रात्री ९.२० पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टला रात्री १०.५९ पर्यंत असेल. असे ज्योतिषी सांगतात. दरम्यान, गुरुवारी १८ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.

जन्माष्टमीचे महत्त्व

Shree Krishna

पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्ण हे भगवान विष्णूच्या सर्वात शक्तिशाली मानवी अवतारांपैकी एक आहेत. जन्माष्टमीचा सण सद्भावना वाढवण्यास आणि अनाचार दूर करण्यास प्रोत्साहन देतो. असे मानले जाते की, या दिवशी पूर्ण भक्तिभावाने पूजा केल्याने भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात.

ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे त्यांच्यासाठी हे व्रत खूप फायदेशीर (Benefits) आहे आणि संतती प्राप्तीसाठी हे व्रत पाळणे खूप चांगले आहे.

जन्माष्टमीची पूजा कशी करावी ?

१. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टमीच्या रात्री १२ वाजता झाला होता.

२. या दिवशीच्या पूजेसाठी भगवान श्रीकृष्णाला दूध आणि गंगाजलाने स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करा.

३. यानंतर त्यांना मोराची पिसे, बासरी, मुकुट, चंदन, वैजयंती माळा, तुळशीचे डहाळे इत्यादींनी सजवा.

४. यानंतर त्यांना फळे, फुले, मखणा, लोणी, साखर मिठाई, मिठाई, सुका मेवा इत्यादी अर्पण करा.

५. त्यानंतर भगवान श्रीकृष्णासमोर दिवा आणि उदबत्ती लावा.

६. या दिवशी लड्डू गोपाळला स्नान घालावे आणि त्याला भोग अर्पण करावा.

७. श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची आरती करावी व प्रसाद वाटावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी; पालिकेचे आदेश जारी

Maharashtra News Live Update: ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Pune : मुसळधार पावसात भयंकर घटना, पुण्यात खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं झालं काय?

8th Pay Commission: सोन्याच्या किंमतीवर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? DA, HRA, पेन्शन आणि एरिअरबाबत मोठा खुलासा

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! तुमच्या संमतीशिवाय PF कापला जाणार नाही, १८०० रुपये अनिवार्य राहणार

SCROLL FOR NEXT