शारदीय नवरात्री ही शरद ऋतूमध्ये साजरी केली जाते. यंदा हा उत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू होत असून ५ ऑक्टोबर पर्यत आहे. नवरात्री उत्सव हा वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो परंतु, ही चार वेळा देखील साजरी केली जाते. यातील दोन या गुप्त नवरात्री असतात.
माघ नवरात्री (हिवाळ्यात-जानेवारी), चैत्र किंवा वसंत (वसंत ऋतूमध्ये मार्च-एप्रिल), आषाढ (पावसाळ्यात-ऑगस्ट) आणि शारदीय (शरद ऋतूमध्ये). शारदीय नवरात्र हे असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. शास्त्रात त्याच्याशी संबंधित दोन पौराणिक कथा आहेत.
दूर्गा देवीच्या नऊ दिवसांचे नऊ रुप
१. शैलपुत्री -
नवरात्रीची पहिल्या दिवसाची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेने होते. तिला पर्वताची कन्या म्हणूनही ओळखले जाते कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे 'पुत्री' आणि पर्वत म्हणजे 'शैल'. ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळतो. तिचा आवडता रंग पांढरा हा आहे.
२. ब्रम्हचारिणी -
नवरात्रीच्या दुसर्या दिवशी, ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तिला भक्ती आणि तपश्चर्येची माता म्हणूनही ओळखले जाते. तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी साखरेचे पदार्थ अर्पण केला जातो. तिचे हे रूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे ध्यानात गुंतलेली होती. तिच्या उजव्या हातात जपमाळ (रुद्राक्ष माळ) आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत. तिचा आवडता रंग लाल आहे.
३. चंद्रघंटा -
तिसर्या दिवशी, चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, या देवींने राक्षसांचा नाश केला होता. तिला १० हात असून आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ, गदा, धनुष्य, बाण, कमळ, तलवार, घंटा आणि एक जलपात्र आहे आणि एक हात आशीर्वाद देणाऱ्या अभय मुद्रामध्ये आहे. तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे, म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात. ती वाघावर स्वार आहे आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे. असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःख दूर करते.
४. कुष्मांडा -
चौथ्या दिवशी, देवी कुष्मांडाची पूजा मनोभावे केली जाते, या देवीला कॉस्मिक एगची देवी म्हणूनही ओळखले जाते. तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो. तिला आठ हात असून ती सिंहावर स्वार आहे. यावेळी, भक्त तिला मालपुआ देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते. तिचा आवडता रंग पिवळा आहे.
५. स्कंदमाता -
पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी, देवी स्कंदमातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे मनोभावे पूजा केली जाते. तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातांनी कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे. तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे. देवीने भगवान कार्तिकेय किंवा स्कंदला आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंदमाता म्हणतात. तिचा आवडता रंग हिरवा आणि तिचे आवडते खाद्यपदार्थ केळी (Banana).
६. कात्यायनी -
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी, देवी शक्तीच्या रूपांपैकी एक 'कात्यायनी' किंवा योद्धा देवीची पूजा करतात. तिला चार हात असून ज्यात तलवार, ढाल, कमळ आणि त्रिशूळ आहेत. ती सिंहावर स्वार होते. तिचा आवडता रंग राखाडी आहे. भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात.
७. कालरात्री
नवरात्रीचा सातवा दिवस, हा देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे, ज्याला कालरात्री म्हणतात, ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते ज्यात तिने तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी गडद रंग स्वीकारला. ती गाढवावर स्वार असून तिला चार हात आहेत. तिच्याकडे तलवार, त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रावर स्थित आहे. तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसादात तिला गूळ अर्पण केला जातो.
८. महागौरी
अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढर्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे. तिचा आवडता रंग जांभळा आहे. महागौरीला भाविक नारळ (Coconut) अर्पण करतात.
९. सिद्धिधात्री
देवी सिद्धिधात्री ही कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचे शेवटचे रूप आहे. तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा, चकती, पुस्तक आणि कमळ आहे. तिचा आवडता रंग गुलाबी आहे. अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी उग्र देवीचे हे रुप तिळावर प्रसन्न होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.