Personality Traits  saam tv
धार्मिक

Purva Bhadrapada Nakshatra : पूर्वा भाद्रपदा नक्षत्र; रविवारचा दिवस ठरणार बदलांचा! वाचा संपूर्ण भविष्य

Personality Traits : पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा स्वभाव, नोकरीतील संधी, आरोग्यावर होणारे परिणाम आणि गुरू ग्रहाचा प्रभाव याची संपूर्ण माहिती येथे मिळवा.

Sakshi Sunil Jadhav

पूर्वा भाद्रपदा

गुरू ग्रहाचे हे नक्षत्र आहे. या व्यक्तींचा स्वभाव स्वावलंबी, धाडसी, काहीसा कठोर असतो. सद्गगुणी , सुशिल, नम्र, विद्याव्यसंगी, देवभक्त, सेवा वृत्तीच्या असतात. मुलाबाळांमध्ये समाधान मानतात. परोपकारी, बोलक्या, समाजप्रिय, कुटुंबवत्सल, सदाचारी, कायद्याचे पालन करणाऱ्या असतात. नावलौकिकाची हौस बाळगणाऱ्या, सुशिक्षित कामसु ,धाडसी असल्या तरी धोका पत्करून उगाचच कशाच्याही आहारी जाऊन कामे करणार नाहीत.

आपला आवाका उरक सांभाळून काम करणारे असतात. त्यामुळे दुसऱ्याच्या साह्याने हळूहळू अधिकार पदावर जाऊ शकतात. उगाचच काहीही खर्च न करणारे, नेहमी कटकटी मागे असणारे, वृत्ती काही शांत आणि संकुचित असते.

नोकरी व्यवसायाचा विचार करता-

हे लोक शिक्षक, प्रोफेसर, कायदातज्ञ, विद्वान, आर्थिक घडामोडींशी निगडित व्यवसाय, नोकरी, विश्वस्त, हॉस्पिटल निरीक्षक, नगरपालिकेत, योजना आयोग, तुरुंगाधीक्षक, राजकारण, फिजिशियन, सर्जन, युद्धबंदी, निर्मल ग्राम योजना, तंटामुक्त केंद्र, गावातला पंच, त्यावर अधीक्षक, सार्वजनिक विकास अधिकारी, प्रकाशक,पुस्तक विक्रेते, कथावाचक, लेखक असतात. विचारात्मक सल्ला समिती अध्यक्ष, व्यवसाय नोकरीमध्ये असू शकतात. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती, विदेशसेवा, शेअर दलाल.

रोग आजार हा

याचा अंमल पायाचे घोटे, खोट्यावरील नळी, पाय, अंगठा हे येतात. हृदयाचे अनियमित स्पंदन, हृदयावर सूज येणे, पाय गुडघे, घोट्यावर सूज येणे, पायाला घाम येणे, पोलिओ, पाय वाकडा असणे, पायाला कुरूप होणे, कावीळ, आतड्यांचे विकार संभवतात. मुहूर्त शास्त्रात पूर्व भाद्रपदा फारसे महत्त्वाचे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharshtra Politics: मनसे की ठाकरेसेना, मुंबईत महापौर कोणाचा? ठाकरेंचा पाच महापालिकांचा फॉर्म्युला ठरला?

Accident : इटलीमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि कारची जोरदार धडक, ४ भारतीयांचा मृत्यू

Coldref Syrup Ban: कफ सिरपनं घेतला 18 मुलांचा बळी, राज्य सरकारनं मोठा निर्णय

Road Cum Rail Tunnel Project: भन्नाट! एकाच बोगद्यातून धावणार कार, बस अन् रेल्वे; 'या' 3 ठिकाणी होणारे नवे महामार्ग

Gautami Patil: मंत्री चंद्रकांत पाटीलांच्या हस्तक्षेप आणि गौतमी पाटीलला क्लीन चिट; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT