मुंबई : ज्योतिषशास्त्रासोबतच हाताच्या रेषांमध्येही अनेक गोष्टी लपलेल्या असतात. विशेषत: हातातील रेषांमधून तयार होणारी चिन्हे स्थानिक आपल्या संबंधित अनेक गोष्टी सांगतात. कधी कधी हातांच्या रेषा मिळून इंग्रजी (English) अक्षरांचे आकार बनतात.
हे देखील पहा -
तळहातावर असलेल्या २ रेषा एकत्र येऊन Y बनतो तेव्हा नेमके काय होते? आपल्याला प्रत्येकाच्या हातात Y अक्षर दिसेल. वेगवेगळ्या रेषांवर आणि पर्वतावर बनलेल्या Y चा अर्थ वेगळा आहे आणि त्याचे महत्त्व देखील वेगळे आहे.
आपल्याला सगळ्यात आधी तळहाताच्या सर्व मुख्य रेषा, जसे की जीवनरेषा, भाग्यरेषा, हृदयरेषा इत्यादीबद्दल समजून घ्यायला हवे. त्या रेषा पातळ, खोल व एकसमान असायला हव्या, एवढेच नाही तर हाताची रेषा जोडलेली नसेल तर ती अशुभ मानली जाते आणि त्यामुळे त्याचा प्रभावही कमी होतो. मंगळ, शनि, विवाह रेषा याही तळहातातील काही अशा रेषा आहेत, ज्या मुख्य रेषांप्रमाणे असतात आणि त्यानुसार व्यक्तीला त्याचे फळही मिळते. ज्या ग्रह किंवा पर्वताकडे रेषा कललेली असतात, त्या दिशेला त्या व्यक्तीला फळ देतात आणि त्याच्या जीवनावर परिणाम करत असतात.
कोणत्याही मुख्य रेषेजवळ त्याच्या शेवटचा बिंदूला Y बनत असेल आणि ती रेषा कापली गेली असेल किंवा Y स्पष्ट नसेल तर याचा अर्थ असा तर आपण अधिक जास्त तणावाचे शिकार बनू शकतो. परंतु, ही रेषा पूर्ण बनत असेल किंवा Y तयार झाल्यानंतर, पुढे एक X किंवा जाळी दिसत असेल तर आपल्या काही भागात व त्या वयात अडचणींचा सामना करावा लागेल.
हातावर Y रेषा तयार होत असेल तर त्याची फले कशी मिळतात जाणून घ्या -
१. जर व्यक्तीच्या मस्तक रेषेचे एक टोक चंद्राच्या दिशेने आणि दुसरे बुधाच्या दिशेने Y बनत असेल तर ही व्यक्ती त्यागी स्वभावाची असेल. अशा परिस्थितीत भाग्यरेषा जर गडद असेल तर हे लोक संशयास्पद आणि आळशी असू शकतात. महिलांच्या (Womens) हातावर अशी रेषा असेल तर ती चांगली मानली जात नाही. अशा महिला खूप भावनिक आणि कल्पक असतात आणि त्यांना खूप जबाबदाऱ्याही पेलाव्या लागतात.
२. मंगळाच्या दिशेने जाताना आपल्या मस्तक रेषेचे एक टोक Y बनत असेल आणि रेषा निर्दोष असेल आणि तुटलेली नसेल तर असे लोक मेहनती, दूरदर्शी आणि भावनिक असतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.