Onam 2022  Saam Tv
धार्मिक

Onam 2022 : श्रवण नक्षत्रात येणारा ओणम 'हा' सण केरळमध्ये का प्रसिध्द आहे ?

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्राच्या दिवशी ओणम सण साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Onam 2022 : दक्षिण भारतातील ओणम हा प्रसिध्द सण आहे. हा दक्षिण भारतातील पारंपारिक सण असून १० दिवस साजरा केला जातो. हा सण केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने साजरा केला जातो.

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्राच्या दिवशी ओणम सण साजरा केला जातो. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस तिरुवोणम सगळ्यात उत्साहात साजरा (Celebrate) केला जातो. येथे श्रवणाला तिरुवोणम असे म्हणतात.

ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.

पंचागनुसार यंदा थिरुवोणम नक्षत्राची सुरुवात बुधवारी ७ सप्टेंबरला संध्याकाळी ४ वाजता सुरु होणार असून गुरुवारी ८ सप्टेंबरला १ वाजून ४६ मिनाटापर्यंत राहिल. ओणम हा सण थिरुवोणम नावाने श्रवण नक्षत्रात साजरा केला जोते.

का साजरा केला जातो ओणम ?

मान्यतेनुसार, केरळ राज्यात महाबली नावाचा एक असुर होता. त्याचा आदर व सत्कारासाठी ओणम हा सण साजरा केला जातो. त्यांच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी व संपन्न होती. यावेळी भगवान विष्णूने वामनाचा अवतार घेतला आणि त्याचे संपूर्ण राज्य तीन पावलांनी नेले आणि त्याला वाचवले. असे मानले जाते की, ते वर्षातून एकदा त्यांची समस्या (Problems) पाहण्यासाठी येतात.

या दहा दिवसात काय केले जाते ?

१. दिवस पहिला (अथम)- ओणमच्या पहिल्या दिवशी पहाटे आंघोळ करून मंदिरात जाऊन देवाची पूजा केली जाते. केळीचे पापड वगैरे नाश्त्यात खाल्ले जातात. यानंतर लोक ओणमची फुलं किंवा पाकलं बनवले जाते

२. दिवस दुसरा (चिथिरा)- दुसऱ्या दिवशी महिला पुन्हा नव्याने हार बनवताता व ही सर्व फुले पुरुष आणतात.

३. दिवस तिसरा (विसकम)- ​​ओणमचा तिसरा दिवस खूप खास असतो. या दिवशी, तिरुवोनमसाठी म्हणजेच ओणमच्या १० व्या दिवशी खरेदी केली जाते.

४. दिवस चौथा (विसकम)- ​​या दिवशी अनेक ठिकाणी फ्लॉवर कार्पेट बनवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यासोबतच १० व्या दिवशी लोणचे आणि बटाटा चिप्ससारखे पदार्थ बनवले जातात.

५. दिवस पाचवा (अनिझम)- पाचव्या दिवशी बोट शर्यत स्पर्धा आयोजित केली जाते. ती वल्लमकली म्हणून ओळखली जाते.

६. दिवस सहावा (थिक्रेता)- या दिवशी विशेष प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या महान सणासाठी मित्र आणि नातेवाईकांनचे देखील अभिनंदन केले आहे.

७. दिवस सातवा (मूलम)- त्याचा सातवा दिवस खूप खास आहे. या दिवशी बाजारपेठा विविध प्रकारच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांनी सजलेल्या असतात. या दिवशी लोकांच्या घरांमध्ये खास पदार्थ असतात.

८. दिवस आठवा (पुरादम) - आठव्या दिवशी लोक मातीपासून पिरॅमिडच्या आकाराच्या मूर्ती बनवतात. या मूर्तींना माँ म्हणतात आणि त्या आहेत.

९. दिवस नववा (उथिरदम)- या दिवसाला पहिला ओणम म्हणतात. हा दिवस देखील विशेष आहे कारण या दिवशी लोक राजा महाबलीच्या आगमनाची वाट पाहत असतात.

१०. दिवस दहावा (थिरुवोनम) - ओणमचा १० वा दिवस सर्वात खास आहे. या दिवशी राजा बळीचे पृथ्वीवर आगमन होते. या दिवशी फुलांचा गालिचा बनवला जातो. थाळीमध्ये पंचपक्वान ठेवले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT