Navratri 2022 Saam Tv
धार्मिक

Shardiya Navratri 2022 : तिसऱ्या माळेला आहे देवी 'चंद्रघंटा', तिला प्रसन्न करण्यासाठी अशाप्रकारे करा 'तिची' पूजा

माता चंद्रघंटाच्या कपाळावर अर्धचंद्रकोर तयार झाल्यामुळे तिला माता चंद्रघंटा म्हणतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shardiya Navratri 2022 : नवरात्रीत (Navratri) नऊ दिवस नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. बुधवार हा नवरात्रीचा तिसरा दिवस असून या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा मातेची पूजा (Pooja) केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, माता चंद्रघंटा राक्षसांचा वध करणारी असल्याचे म्हटले जाते. माता चंद्रघंटाच्या कपाळावर अर्धचंद्रकोर तयार झाल्यामुळे तिला माता चंद्रघंटा म्हणतात.

माता चंद्रघंटाचे वाहन सिंह आहे. दहापैकी चार हातांत कमळाचे फूल, धनुष्य, जपमाळ, उजव्या हातात बाण आणि पाचव्या हातात अभय मुद्रा आहे. त्याचबरोबर डाव्या हातात त्रिशूळ, गदा, कमंडल, तलवार आणि पाचवा हात वरद मुद्रेत राहतो. चंद्रघंटा माता आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते. सर्वात मोठा शत्रूसुद्धा त्याच्या घंटा वाजवण्यापुढे टिकू शकत नाही.

देवी चंद्रघंटाच्या पूजेची पद्धत -

माता चंद्रघंटाची मूर्ती किंवा चित्र मातेच्या आपल्या देवघरात बसवा. यानंतर गंगाजल किंवा गोमूत्राने घर शुद्ध करा. चांदीच्या, तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यावर नारळ ठेवून कलशाची स्थापना करावी. यानंतर उपासनेचे व्रत घ्या आणि माता चंद्रघंटासह सर्व स्थापित देवतांची वैदिक आणि सप्तशती मंत्रांनी पूजा करा.

यामध्ये आमंत्रण, मुद्रा, पाद्य, आश्रय, आचमन, स्नान, वस्त्र, शुभ सूत्र, चंदन, रोळी, हळद, सिंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, अलंकार, फुल-हार, सुगंधी पदार्थ, धूप-दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्रपुष्पांजली इ.

मुलींना खीर, हलवा किंवा स्वादिष्ट मिठाई अर्पण करून चंद्रघंटा माता प्रसन्न होते. गाईच्या दुधाची खीर चंद्रघंटा मातेला प्रसाद म्हणून अर्पण केल्याने सर्व बाधांपासून मुक्ती मिळते.

कथा -

पौराणिक कथेनुसार, जेव्हा राक्षसांची दहशत वाढू लागली तेव्हा दुर्गा मातेने चंद्रघंटाचा अवतार घेतला. त्या वेळी दैत्यांचा स्वामी महिषासुर देवतांशी भयंकर युद्ध करीत होता. महिषासुराला देव राज इंद्राचे सिंहासन मिळवायचे होते. स्वर्गीय जगावर राज्य करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा जाणून सर्व देवता अस्वस्थ झाले आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासमोर हजर झाले.

देवांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून तिघांनाही राग आला. क्रोधामुळे तिघांच्याही मुखातून ऊर्जा निर्माण झाली. त्याच्यापासून एक देवी अवतरली. ज्यांना भगवान शंकराने आपले त्रिशूल दिले आणि भगवान विष्णूने आपले चक्र दिले. तसेच इतर देवी-देवतांनीही आपली शस्त्रे मातेच्या हातात दिली. सूर्य देवाने आपली धारदार तलवार दिली, सिंहावर देवी स्वार झाली.

यानंतर माता चंद्रघंटा महिषासुराला मारण्यास पोहोचली. मातेचे हे रूप पाहून महिषासुराला आपली वेळ आल्याचे जाणवले. महिषासुराने मातेवर हल्ला केला. यानंतर देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले. माता चंद्रघंटाने महिषासुराचा वध केला. अशा प्रकारे मातेने देवतांचे रक्षण केले.

चंद्रघंटा देवीची महती -

भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

मंत्र -

पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।

प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥

या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

SCROLL FOR NEXT