History of Kumbh Mela Saam Tv
धार्मिक

Kumbh Mela Katha: कुंभमेळ्याला कशी सुरुवात झाली? १२ वर्षांनीच का होतो महाकुंभ मेळा, जाणून घ्या पौराणिक कथा?

History of Kumbh Mela: १३ जानेवारीपासून २०२५ पासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होणार आहे. कुंभमेळा २६ फेब्रुवारी २०२५ ला संपणार आहे. परंतु कुंभमेळ्याचं आयोजन का होतं हे तुम्हाला माहितीये का?

Bharat Jadhav

कुंभमेळा भारतातील चार पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे या कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. २०२५ मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभ भरणार आहे. कुंभमेळ्यात स्नान केल्यानं आपल्या पापांचं नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत असतो. परंतु तुम्हाला माहितीये का? महाकुंभ मेळा १२ वर्षानंतरच का आयोजित केलं जातं? दरम्यान महाकुंभ २०२५ चे आयोजन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. महाकुंभ १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीला संपेल.

काय आहे पौराणिक कथा

कुंभ म्हणजे घागर. कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झालीय. पौराणिक कथेनुसार, एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झालं होतं. ऋषी दुर्वासा यांनी देवांना श्राप दिला होता. त्यामुळे ते कमजोर झाले होते. याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं. त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली.

तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायला सांगितलं. अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवान झाले असते. जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं. त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यास तयार झाले.

समुद्र मंथनातून निघाल्या अनेक वस्तू

समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. यात कामधेनु गाय, विष आणि शेवटी अमृताचे घागर निघाली. अमृताचे घागर बाहेर पडताच ते मिळविण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले. यादरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली. तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला. यादरम्यान देव आणि दानवांमध्ये १२ ठिकाणी लढाई झाली.

यादरम्यान अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार ठिकाणी पडले. ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. याठिकाणी अमृताचे थेंब पडली. यामुळे या ठिकाणांना पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे तेथे महाकुंभ मेळा आयोजित केला जातो.

१२ वर्षांनी का होतो महाकुंभ मेळा

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, कुंभमेळा दर १२ वर्षांनीच का आयोजित केला जातो. त्याचं उत्तर असं की, पौराणिक मान्यतेनुसार, जयंतला अमृत पात्रासह स्वर्गात पोहोचण्यासाठी १२ दिवस लागले. देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील एक वर्ष असतो. त्यामुळे कुंभ मेळा १२ वर्षांनंतर केला जातो. महाकुंभ हे फक्त धार्मिक गोष्टींच आयोजन नाही तर आस्था, संस्कृती आणि परंपराचं संगम असतो. या मेळ्यात लाखो भाविक नदीच्या पाण्यात पवित्र स्नान करत असतात. हे स्नान केल्यानं भाविकांचे पाप नष्ट होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : भिवंडीत तुफान हाणामारी, दुचाकीच्या वादावरून तरुणाला चोपलं, वाचवायला आलेल्या कुटुंबियांवर हल्ला

पुण्यात विषारी दारूकांड! मृतांचा आकडा २२ वर पोहोचला; प्रशासनाकडून मदत जाहीर, मृत्यूतांडवाला जबाबदार कोण?

Pune: हातभट्टीवरची दारू, मिथेनॉल ऑनलाइन मागवलं; २२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारूकांडाचा घटनाक्रम उघड, हादरवणारी माहिती समोर

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

SCROLL FOR NEXT