Guru Gochar 2024 Saam Tv
धार्मिक

Rashi Guru: २०२४च्या शेवटपर्यंत 'या' ३ राशींवर राहील गुरुची कृपा; आर्थिक चणचण होणार दूर

Guru Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु लवकरच मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत १२ पैकी ३ राशींचे भाग्य वाढू शकते. चला जाणून घेऊया याचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Guru Gochar 2024 Benefits For Rashi:

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार १ जुलै रोजी गुरु ग्रह आपली राशी बदलणार आहे. या दिवशी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत गुरूच्या संक्रमणामुळे काही राशींना फायदा तर काही राशींना नुकसान होऊ शकते. काही राशीच्या लोकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरूला विशेष स्थान आहे. ज्यांच्यावर गुरू ग्रहाची कृपा असते त्यांचे नशीब बदलते, असं म्हटलं जातं.(Latest News)

ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु हा ग्रह ज्ञान, शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, दान, पवित्र स्थान आणि संपत्ती वाढीसाठी जबाबदार असतो. ज्योतिषांच्या मते गुरुवारी २७ नक्षत्रांपैकी पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा स्वामी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. तसेच नवीन वाहन किंवा घर घेण्याचे नियोजन करता येईल. गुरूच्या कृपेने तुम्हाला तुमच्या सर्व कार्यात यश मिळेल. तसेच वैवाहिक जीवनात आनंदही राहील. कोणत्याही कामात तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना गुरूच्या राशी बदलामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीतील अनेकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. सिंह राशीचे लोकांना भाग्याची साद मिळेल. याचा अर्थ सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि नोकरदारांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे

धनु

धनु राशीच्या लोकांना गुरुच्या राशी बदलामुळे चांगल्या घटना घडतील.धनु राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांना अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. या राशीतील ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यातील काहींना दुप्पट फायदा होऊ शकता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. बहुतेकांना सर्व कामांमध्ये यशही मिळेल.

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VoLTE-VoNR: Jio ने सुरु केली नवीन सेवा; VoLTE की VoNR? नवीन 5G सेवेत कोणता फरक जाणून घ्या

Railway News : पुण्यासाठी रेल्वेचं गिफ्ट.. दिवाळी अन् दसऱ्यात धावणार विशेष ३०० गाड्या, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

Viral Video: जीव धोक्यात घालून महिलेने दरोडेखोरांना शिकवला धडा, थेट ऑटोरिक्षाला लटकली...

SCROLL FOR NEXT