Govardhan Puja 2022
Govardhan Puja 2022 Saam Tv
धार्मिक

Govardhan Puja 2022 : गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे ? जाणून घ्या; पद्धत, महत्त्व आणि कथा

कोमल दामुद्रे

Govardhan Puja 2022 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. देशाच्या काही भागात याला अन्नकूट म्हणूनही ओळखले जाते. मात्र यंदा सूर्यग्रहणामुळे गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी होणार नाही. दिवाळी (Diwali) 24 ऑक्टोबरला असली तरी गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबरला होणार आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, गोवर्धन पर्वत आणि गायींची पूजा केली जाते. गोवर्धन पूजेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला 56 किंवा 108 प्रकारचे पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते. या पदार्थांना 'अन्नकूट' म्हणतात. (Latest Marathi News)

गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट कधी साजरा केला जातो?

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला गोवर्धन पूजा साजरी केली जाते. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी अन्नकूट साजरा केला जातो. मात्र यंदा सूर्यग्रहणामुळे गोवर्धन पूजा २६ ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी भाऊबीजेचा सणही साजरा केला जाणार आहे.

गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त-

गोवर्धन पूजा सकाळचा मुहूर्त - 06:29 AM ते 08:43 AM

कालावधी - 02 तास 14 मिनिटे

प्रतिपदा तारीख प्रारंभ - 25 ऑक्टोबर 2022 दुपारी 04:18 वाजता

प्रतिपदा समाप्त होईल - 26 ऑक्टोबर 2022 दुपारी 02:42 वाजता

गोवर्धन पूजेची पद्धत-

गोवर्धन पूजा करण्यासाठी सर्वप्रथम घराच्या अंगणात शेण टाकून गोवर्धनाचे चित्र बनवावे. यानंतर कुंकू, तांदूळ, खीर, बत्ताशे, पाणी (Water), दूध, सुपारी, केशर, फुले, दिवे लावून भगवान गोवर्धनाची पूजा करावी. या दिवशी विधींच्या साहाय्याने भगवान गोवर्धनाची मनोभावे पूजा केल्यास भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद वर्षभर राहतो, असे म्हटले जाते.

पौराणिक कथा-

असे मानले जाते की, ब्रज लोकांच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीत गोवर्धन पर्वत उचलून भगवान इंद्राच्या क्रोधापासून हजारो प्राणी आणि मानवी जीवनांचे रक्षण केले होते. श्रीकृष्णाने इंद्राच्या अभिमानाचा चुराडा करून गोवर्धन पर्वताची पूजा केली. या दिवशी लोक आपल्या घरी शेणापासून गोवर्धन बनवतात. काही लोक गाईच्या शेणाने गोवर्धन पर्वताची पूजा करतात तर काही लोक शेणाने जमिनीवर गोवर्धन देव बनवतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Vishal Patil News | वंचितचं ठरलं! विशाल पाटलांना देणार साथ

Today's Marathi News Live : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आकर्षक रोषणाई

Nilesh Lanke News | निलेश लंकेंचा पोलिसांवर सनसनाटी आरोप! कार्यकर्त्यांना कुणी धमकावलं?

Sharad Pawar यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT