Ganeshotsav 2022 Saam Tv
धार्मिक

Ganeshotsav 2022 : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी ! या पध्दतीने करा लाडक्या गौरी-गणपतीचे विसर्जन

याप्रकारे करा लाडक्या गौरी- गणपतीचे विसर्जन.

कोमल दामुद्रे

Ganeshotsav 2022 : राज्यात सर्वत्र गणोशोत्सवाचा काळ दिसून येत आहे. गणपती (Ganpati) घरी आले की, घर अगदी प्रसन्न होऊन जाते. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात कोणत्याच गोष्टीची कमतरता आपण करत नाही.

बाप्पासाठी मोदक, लाडू अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण त्याच्या पुढ्यात ठेवतो. हा पाच किंवा सहा दिवसाचा पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या लाडक्या गौराईसोबत आपला निरोप घेणार आहे.

या काळात लाडका भक्त अगदी मनोभावे बाप्पाची आराधना करतो, त्याला हवे नको ते सारे पाहातो. जड अंत:करणाने गणेशभक्त लाडक्या बाप्पासह गौराईला निरोप देतील.

गणपतीच्या आगमनाची वाट आपण महिनाभरापासून पाहत असतो. बाप्पाला निरोप देताना आपल्या डोळे पाणावल्याशिवाय राहात नाही.

विसर्जनाचा मुहूर्त

३ सप्टेंबरला शनिवारी लाडक्या गौराईचे आगमन झाले व दुसऱ्या दिवशी आवाहन. त्यानंतर आज गौरी-गणपतीचे उत्साहात विसर्जन होईल. गौरी विसर्जनासाठी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. यादरम्यान भक्तगण आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन करु शकतात.

या दिवशी काही जण पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवतात तर काही जण निरोपाच्या वेळी बाप्पाला दुध (Milk) भाताचा नैवेद्य दाखवतात. गणेशाला आपल्या चारही बाजूमध्ये फिरवून त्याचा सहवास आपल्या घरात राहो अशी त्याच्याजवळ प्रार्थना करतात.

विसर्जन मंत्र

ॐ गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ, स्वस्थाने परमेश्वर

यत्र ब्रह्मादयो देवाः, तत्र गच्छ हुताशन ।।

ॐ श्री गणेशाय नमः, ॐ श्री गणेशाय नमः, ॐ श्री गणेशाय नमः।

हा मंत्र बोलून लाडक्या गणरायाचे आपल्या घरातून वाजत गाजत विसर्जन करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahindra-Maruti Cars: स्वस्त किंमतीत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार, महिंद्रा आणि मारुतीची बाजारात होणार धमाकेदार एंट्री

Maharashtra Live News Update : भाजपचा कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gautami Patil : नाकात नथ अन् गुलाबी साडी; गौतमी पाटीलच्या नखरेल अदा, पाहा PHOTOS

Ambernath: नालेसफाईची तक्रार केल्याचा राग, भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', धाड टाकत पोलिसांकडून वेश्या व्यावसायाचा भंडाफोड; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT