Dhanteras 2022 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसातच सर्वत्र सुरु होईल व याची सर्वत्र धामधूम आपल्याला पाहायला मिळेल. यंदा धनतेरसचा दिवस हा २२ ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशी हा संपत्ती आणि समृद्धीचा शुभ सण मानला जातो.
'धन' म्हणजे पैसा, तर 'तेरस' म्हणजे कृष्ण पक्षातील तेरावा दिवस. विशेषतः, भारतात दिवाळीचा पहिला दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो. (Latest Marathi News)
असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या महासागरातून प्रकट झाली.
मुहूर्त
यंदा धनत्रयोदशीच्या नेमक्या तारखेबाबत काहींच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. काहींच्या मते धनत्रयोदशी 22 ऑक्टोबरला पडेल, तर काहींच्या मते ती 23 ऑक्टोबरला असेल. यंदाच्या धनत्रयोदशीच्या पूजेची वेळ 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 ते रात्री 8.17 दरम्यान असेल.
या दिवशी लोक सहसा सोने, चांदी व पितळेच्या वस्तू खरेदी करतात. तसेच, या दिवशी समृध्दी व वाईटांपासून देखील आपले संरक्षण होते.
या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते, तर अनेक लोक चुकीच्या वस्तू खरेदी करून चुका करतात, ज्यामुळे दुर्दैवी परिस्थिती उद्भवू शकते. या दिवशी तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी करणे टाळावे हे आम्ही सांगणार आहोत.
धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणे टाळावे?
या शुभ दिवशी राहू किंवा अशुभ चिन्हांशी संबंधित तीक्ष्ण वस्तू, ज्यात चाकू, कात्री, पिन इत्यादी वस्तूंची खरेदी करणे टाळा
त्याचप्रमाणे काचेच्या वस्तू खरेदी करू नयेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंड, अॅल्युमिनियम आणि प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका.
तसेच या दिवशी तेल (Oil) किंवा तूप खरेदी करू नये.
धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणे योग्य आहे?
धनत्रयोदशीच्या वेळी घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण तांबे, पितळ आणि चांदीची भांडी खरेदी करू शकता ज्यामध्ये पाणी किंवा अन्न भरले जावे.
सोन्या-चांदीची नाणी तसेच सोन्याचे (Gold) दागिने धनत्रयोदशीला सौभाग्य मिळवून देतात
धनत्रयोदशीला धातूची किंवा मातीची लक्ष्मी आणि गणेश मूर्तीची खरेदी शुभ मानली जाते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.