Darsh Amavasya 2024 
धार्मिक

Darsh Amavasya 2024: पितरांना प्रसन्न करण्यासाठी दर्श अमावस्येला कशी करावी पूजा?

Darsh Amavasya 2024: दर्श अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आर्शीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करावी. मात्र ही पूजा विधीवत केली गेली पाहिजे.

Bharat Jadhav

दर्श अमावस्येला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या अमावस्येला पितरांना प्रसन्न केलं जातं. या दिवशी पितरांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध कर्म केल्याने आपल्यावरील पितृ दोष कमी होत असतो. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. मान्यतेनुसार, अमावस्येच्या दिवशी पितृ लोक आणि पृथ्वी तलावरील द्वार खुले होत असतात.

या दिवशी पितृ आपल्या वंशातील लोकांना भेटण्यासाठी येत असतात. यामुळे पितरांना प्रसन्न आणि खूश करण्यासाठी या दिवशी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध कर्म केले पाहिजे. ही पूजा विधीपूर्वक केली पाहिजे. दर्श अमावस्येला पितरांच्या आत्म्याची शांती आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी योग्य उपासना पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया.

दर्श अमावस्या तिथी-नवमी

पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या दर्श अमावस्या तिथीची सुरुवात ३० नोव्हेंबरला सकाळी १० वाजेपासून २९ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर अमावस्या तिथीची समाप्ती १ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी होणार आहे. तर उदया तिथीनुसार, दर्श अमावस्या ३० नोव्हेंबरच्या दिवशी शनिवारीच असेल. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण केले जाईल. तर डिसेंबर रोजी म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या सकाळी ११ वाजेपर्यंत दान पुण्य आणि गंगा स्नानसाठी शुभ वेळ असेल.

यामुळे दोन्ही दिवशी अमावस्येशी संबंधित वेगवेगळी कार्य केली जाऊ शकतात.

दर्श अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्याची पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून गंगाजलाने स्नान केल्याने पवित्रता प्राप्त होते.

या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा.

पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. त्यावर जल अर्पण करा, दिवा लावा आणि अगरबत्ती लावा.

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, कुश, गंगाजल आणि दुधाचे काही थेंब टाका. दक्षिण दिशेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने प्रार्थना करा.

या दिवशी श्राद्ध करणे हा पितरांना संतुष्ट करण्याचा सर्वोत्तम उपाय मानला जातो.

अमावस्येच्या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र इत्यादी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नदीत किंवा तलावात वाहून द्या.

दर्शन अमावस्येला पूजा साहित्य

गाईचे दूध, दही, तूप

कुशा, काळे तीळ आणि बार्ली

गंगेचे पाणी

फुले, अगरबत्ती, दिवे

पूर्वजांचे अन्न (खीर, पुरी, भाज्या आणि साधे अन्न)

पांढरे कपडे आणि इतर पूजा साहित्य

दर्श अमावस्येचे महत्त्व

पितरांची प्रार्थना करणे, पुण्य कर्म करणे आणि शांती प्राप्त करणे यासाठी दर्शन अमावस्येचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते.

या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

या दिवशी चंद्र देवाची पूजा करून पितृ तर्पण केले जाते. या दिवशी दान करणे देखील पुण्य मानले जाते.

कुटुंबातील सदस्यांचे पुण्य लाभ आणि पितरांच्या शांतीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

Amol Khatal:संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला|Video

SCROLL FOR NEXT