The whole village in Manchar has an antigen test 
बातमी मागची बातमी

मंचरमधील पूर्ण गावाचीच होतेय अँटिजेन टेस्ट 

मंगेश गाडे

मंचर: कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील मंचर या गावातील सर्व नागरिकांच्या कोरोना च्या अँटीजन टेस्ट करण्यात येत आहेत. मंचर शहरातील कोरोनाची वाढती  साखळी तोडण्यासाठी आंबेगाव तालुका तहसील कार्यालय, पंचायत समिती आंबेगाव, उपजिल्हा रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ आणि ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंचर मध्ये कोरोना चाचणीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. The whole village in Manchar has an antigen test

मंचर ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेनुसार गावातील सहा वार्ड मध्ये कोरोना तपासणीची तात्पुरती सहा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सहाही ठिकाणी गावातील नागरिकांची कोरोना अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना तपासणीच्या या महा मेळाव्याला मंचर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. या सहाही केंद्रांवर कोरोना अँटीजन टेस्ट करण्यासाठी सकाळ पासूनच नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात होळीच्या कार्यक्रमात तरुणाला बेदम मारहाण

Mumbai Tourism : लोणावळा-खंडाळा विसरा! मुंबईजवळचं 'हे' ठिकाण पाहिलंत का? एकदा जाल तर घरचा रस्ता विसराल

Iran-Israel War: इराण-इस्रायलच्या युद्धाचा भारताला मोठा फटका; फक्त २५ दिवस पुरेल इतकाच देशात तेलसाठा

अपघाताचा थरार! भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, धुळवडीच्या दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Pineapple Curry Recipe : घरीच ५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंट स्टाइल 'अननस करी', चवीला १ नंबर

SCROLL FOR NEXT