Trees Falled down on Konkan Railway Track
Trees Falled down on Konkan Railway Track 
बातमी मागची बातमी

Tauktae Cyclone : कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर झाडे पडली; नेत्रावती एक्स्प्रेस खोळंबली

मिलिंद संगई

पणजी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाच्या Tautkae Cyclone सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गोव्यात Goa अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. कोकण रेल्वेच्या Konkan Railway ट्रॅक वर तीन ठिकाणी झाडे पडल्याने नेत्रावती एक्सप्रेस माजोरडयाजवळ थांबून होती. त्यामुळे थिवि ते मडगाव Madgaon रेल्वे वाहतूक खोळंबली होती. Trees Collapsed on Konkan Railway Track Netravati Express Halted

अरबी समुद्रात Arabian Sea निर्माण झालेल्या चक्रीवादळ 'तौक्ते'ने गोव्याला अक्षरशः फोडून झोडपून काढले आहे.   गेल्या रात्रीपासून गोव्यात मुसळधार पाऊस पडत असून सोसाट्याचा वाराही सुटला आहे. यामुळे २७ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

या चक्रीवादळामुळे समुद्राला तुफान आले असून समुद्रात ४ ते ६ फुट उंचीच्या लाटा निर्माण होऊन त्या किनाऱ्याला धडकत आहेत.  याबरोबरच समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटर बनल्याने किनाऱ्या भागांमध्ये झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली आहे. हे चक्रीवादळ ताशी १० किलोमीटर वेगाने उत्तरेकडे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन चे नियोजन करून आज पहाटेपासूनच वादळाच्या आगमना नंतर होणाऱ्या नुकसानीबाबत किंवा मनुष्य हानीबाबत सतर्क राहत सर्व तयारी केली होती. दस्तुरखुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियंत्रण कक्षा मध्ये पहाटेपासूनच हजेरी लावली होती. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पहाटेच्या सुमारास घेतली. दरम्यानच्या कालावधीत पहाटे चक्रीवादळाचा प्रवेश गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला. Trees Collapsed on Konkan Railway Track Netravati Express Halted

दरम्यान, सिंधुदुर्गात तौक्ते चक्री वादळाची तीव्रता वाढलेले आहे दुपार नंतर या चक्री वादळाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे हे  वादळ कुणकेश्वर आणि देवगड किनारपट्टीला फटका बसण्याची शक्यता हवामान बदल वर्तवली आहे वाऱ्याचा  वेग तशी एकशे वीस ते दीडशे प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT