Disposal of plastic 
बातमी मागची बातमी

प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम ...

साम टीव्ही

रस्त्यावर सातत्याने पडणारे खड्डे, निकृष्ट दर्जाचे रस्ते , यामुळे मुंबईतील वाहनचालक बेजार होऊन जातात . त्यामुळे आता दर्जेदार रस्ते मुंबईकरांना देण्यासाठी आणि प्लॅस्टिकमुक्त मुंबईसाठी महापालिकेने संयुक्त प्रकल्प हाती घेतलाय. नेमकं काय पाहुयात या रिपोर्ट मधून .

मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे मुंबईत चांगले रस्ते आहेत , तसेच खराब आणि सतत खड्डे पडणारे रस्ते देखील आहेत . ज्या रस्त्यांवरून मुंबईकरांचा प्रवास करताना अडव्हेंचर केल्याचा अनुभव मिळतो . हे रस्ते कधी चांगले होणार असा मुंबईकरांना प्रश्न कायम आहे . त्याच बरोबर पावसाळ्यात मुंबईतल्या नाल्यांमध्ये , रस्त्यावर प्लॅस्टिकमुळे पाणी साचण्याच्या घटना सातत्याने घडत असतात . या प्लास्टिकच विघटन देखील होत नाही . त्यामुळे या वेस्ट प्लास्टिकचा वापर मुंबईकरांना दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी महापालिका करणार आहे . मुंबई महापालिका आता  मुंबई पालिकेच्या अखत्यारीतील रस्ते बनवण्याच्या कामात प्लास्टिकचा वापर करणार आहे .

मुंबईत एकूण रस्त्यांपैकी २ हजार किलोमीटरचे रस्ते मुंबई पालिकेच्या अखत्यारीत येतात . या रस्त्यांची देखभाल कंत्रातदारांमार्फत पालिका करत असते . त्यामुळे या वर्षी महापालिका २४ प्रभागात ३० टेंडरच्या माध्यमातून १४ शे कोटी रुपये खर्चून १५७ किमी लांबीचे नवे रस्ते तयार करणार आहे . यात १४५ रस्ते सिमेंट काँक्रीट तर १२ रस्ते डांबरीकरणाचे केले जाणार आहेत . यामध्ये डांबरीच्या रस्त्याच्या वरच्या थरांमध्ये ३० मिमीच्या थरांमध्ये ५% मटेरियल प्लास्टिकचा वापरण्यात येणार आहे . तसे आदेशच कंत्राटदारांना पालिकेने दिले आहेत .

रस्त्यामध्ये प्लास्टिकचा वापर झाल्यास हे रस्ते ठोस नसतील, आणि त्यात लवचिकपणा देखील असेल . या रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता देखील कमी असते . तसेच हे रस्ते बराच काळ टिकणारे असल्यामुळे त्याची सतत डागडुजी करावी लागणार नाही, आणि त्यामुळे पैसे पालिकेचे दगडुजीसाठीचे वाचणार आहेत . त्यामुळे मुंबईकरांसाठी ही महापालकेची नवी योजना प्रवास सुखकर करणारी असेल असं म्हणायला हरकत नाही .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT