बातमी मागची बातमी

टिकटॉक व्हिडीओसाठी सापांचा छळ का?

साम टीव्ही न्यूज

माणसांपासून फटकून दूर राहणारा सापासारखा प्राणी आज माणसाच्याच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जिवाला मुकतोय. टिकटॉकचे व्हिडीओ काढण्यासाठी या सापांचा अक्षरशः छळ मांडला जातोय.

सापांना पकडून त्यांचा संग्रह करण्याचा नवीन ट्रेंड वाढतो आहे. कोणाकडे किती दुर्मीळ आणि किती मोठे अजगर आहेत, यावरून सर्पमित्रांना महत्त्व मिळते. या सापांना गळ्यात घालून ही मंडळी फेसबुक, व्हॉट्सअॅपवर फोटो टाकून फुशारकी मारण्याचा प्रयत्न करतात. नागपंचमीला होणाऱ्या सापांच्या हेळसांडीविषयी वन विभागाचे अधिकारी कळवळा दाखवतात. मात्र, सर्पमित्रांच्या हौसेमुळे वर्षभर सातत्याने मृत्युमुखी पडणाऱ्या सापांकडे वनाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

अजगराला गळ्यात गुंडाळून, सापाचा 'किस' घेताना, एकावेळी अनेक साप अंगावर घेऊन शेकडो लाइक मिळविणारे सर्पमित्र सध्या चर्चेत आले आहेत. असले वेडे धाडस करण्यामुळेच अनेक सर्पमित्राने प्राण गमावले. सापांबरोबर खेळ खेळणाऱ्या या सर्पमित्रांकडे वन विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.खरे सर्प मित्र बाजूला राहिले असून सापा बरोबर टीकटॉक करणारे गारुडी जास्त झाले आहेत.

सापांबद्दल आजही बहुतेक भारतीयांच्या मनात एक भीती आहे..आणि या भीतीमुळेच शेतकऱ्यांचा हा मित्र सुरक्षित राहू शकतो..पण गेल्या काही दिवसांत सोशल मीडियात काहीतरी हटके फोटो, व्हिडीओ टाकण्याची आलेली क्रेझ आता या सापांच्या जीवावर बेतू लागलीय. या खेळात सापांचे मात्र चांगलेच हाल होतायत. अनेक साप जिवाला मुकतायत.
साप आणि माणूस नेहमीच एकमेकांपासून अंतर ठेवून राहत आलेत..दोघांच्याही दृष्टीनं ते योग्यच आहे. मात्र, माणसाचा प्रसिद्धीचा हव्यास त्याचा आता जीव घेतोय. ते रोखायला हवं.

Web Title - Tiktok with snakes is harmful for snakes...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Crime: नवऱ्यासोबत भांडण; रागाच्या भरात आईने ६ वर्षाच्या मुलाला मगरीच्या कालव्यात फेकलं

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

SCROLL FOR NEXT