SANGALI CORONA 93 960
SANGALI CORONA 93 960 
बातमी मागची बातमी

चिंता वाढवणारी बातमी! पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले, ते पण चार

विजय पाटील

सांगली - सांगलीतील इस्लामपूर मध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले आहेत. 4 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले. ते चौघेही सौदी अरेबिया मधून आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळूंखे यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 93 वर पोहचलीय. सांगलीतील इस्लामपूर मध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले.

आज (23 मार्च) सकाळीच कोरोना रुग्णांचा आकडा 89वर गेला होता. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढतोच आहे. गेल्या बारा तासात राज्यात कोरोनाचे नवे पंधरा रुग्ण आढळून आले आहेत. यांत मुंबईतल्या 14 तर पुण्यातील एका नव्या रुग्णाची भर पडलीय. या नव्या रुग्णांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकोणनव्वदवर पोहोचली. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या चारशे तीनवर गेली होती. 

आतापर्यंत देशाता कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. या वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यामुळे राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचं भयाण वास्तव समोर आलं आहे. या वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील चिंता निश्चितच वाढली आहे. आता हा आकडा लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

जवळपास अख्खं गाव क्वॉरंटाईन

आतापर्यंत महानगरांमध्ये पाहायला मिळालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता गावागावतही पोहोचू लागलाय. पुण्यातल्या एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने, वेल्हा तालुक्यातील पानशेत धरणाशेजारी असलेल्या वरसगावच्या ग्रामस्थांवर क्वारंटाईनमध्ये राहण्याची वेळ आली आहे. बेजबाबदार
पणामुळे अख्ख्या वरसगावासह 25 गावं आणि 81 ग्रामस्थांवर लॉकडाऊनची वेळ ओढवलीय. या गावातील प्रत्येकाचं विलगीकरण करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय पथक पूर्णपणे देखरेख ठेवून आहे.

कोरोनाचे रुग्ण राज्यात कसे कुठे वाढत गेले?

10 मार्च - 2 रुग्ण
17 मार्च - 39 रुग्ण
18 मार्च - 42 रुग्ण
19 मार्च - 49 रुग्ण
20 मार्च - 52 रुग्ण
21 मार्च - 67 रुग्ण
22 मार्च - 74 रुग्ण
23 मार्च  (सकाळी)- 89 रुग्ण

23 मार्च  (संध्याकाळी ७ पर्यंत)- 93 रुग्ण

पाहा व्हिडीओ - Live Updates Of corona

maharashtra raising number of corona covid 19 patient rapidly marathi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

Nasim Khan News : कॉंग्रेसचं नाराजीनाट्य शमलं! नसीम खान यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी..

SCROLL FOR NEXT