बातमी मागची बातमी

VIDEO | "एकेकाळी इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला" - जितेंद्र आव्हाड

साम टीव्ही न्यूज

इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्नः आव्हाड
बीडः जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली असून काँग्रेस नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, असे आव्हाडांना खडसावले.देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाही समान आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांना लक्ष्य केले. 

आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर आव्हाड यांनी खुलासा करणारे ट्विट केले आहे.बीडमध्ये बुधवारी 'संविधान बचाव' महासभा झाली, या वेळी बोलताना आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. या सभेला माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अबू तालिब रहेमानी, ‘जेएनयू’ची विद्यार्थिनी दीपशिखा धर आदी उपस्थित होते.  आव्हाड यांनी ट्विट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी-शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास ही पोहचू शकत नाही, असे आव्हाड म्हणाले.


आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांनी एक ट्विट केले असून त्यात म्हटले की, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

Today's Marathi News Live : खालच्या पातळीवरचं राजकारण केवळ भाजपच करू शकतं; आदित्य ठाकरे

Pune News | गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू

ICC Women's T20 WC: ICC कडून महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ

SCROLL FOR NEXT