ICC Women's T20 WC: ICC कडून महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ

ICC T20 World Cup 2024 Schedule: आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी( ५ मे) आगामी महिला टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील नवव्या हंगामाला येत्या ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
icc womens t20 world cup 2024 scheduled announced know full details here in marathi amd2000
icc womens t20 world cup 2024 scheduled announced know full details here in marathi amd2000twitter

आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी( ५ मे) आगामी महिला टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील नवव्या हंगामाला येत्या ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघासह १० संघ एकमेकांविरुद्ध भिडताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण २३ सामने खेळले जाणार आहेत. य स्पर्धेसाठी १० संघांना २ गटात विभागलं गेलं आहे. प्रत्येक गटात ४-४ संघ असणार आहेत. दोन्ही गटातील टॉप २ संघांना सेमीफायनलध्ये प्रवेश मिळणार आहे.

या दिवशी होणार भारत -पाकिस्तान सामना...

भारतीय संघ ४ ऑक्टोबर रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर भारत- पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघाचा तिसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी क्वालिफायर १ सोबत आणि चौथा सामना १३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने सिलहटमध्ये खेळले जाणार आहेत .

icc womens t20 world cup 2024 scheduled announced know full details here in marathi amd2000
PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

असे आहेत दोन्ही ग्रुप -

ग्रुप ए- भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, क्वालिफायर १

ग्रुप बी - इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, क्लालिफायर २

भारतीय संघाला अजून एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. सर्वाधिक वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ६ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर वेस्टइंडीज आणि इंग्लंडने प्रत्येकी १-१ वेळेस जेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघाने २०२० मध्ये झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

icc womens t20 world cup 2024 scheduled announced know full details here in marathi amd2000
MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com