भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की, मान्सूनने Monsoon उत्तर प्रदेशातील काही भाग, पंजाब, राजस्थान आणि गुजरात वगळता देशातील जवळजवळ सर्व भागात प्रवेश केला आहे. भारत हवामान विभागाने कोकण Kokan आणि गोव्यासाठी Goa रेड अलर्ट जारी केला आहे. मान्सून देशात वाढल्याने सोमवारी महाराष्ट्र, किनारी जिल्हे आणि कर्नाटक, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडच्या दक्षिण भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD issues Red and Orange Alert for these States
भारतीय हवामान खात्याच्या बेंगळुरू Bangalore युनिटचे संचालक सी.एस. पाटील यांनी माहिती दिली आहे की, १७ जूनपर्यंत कर्नाटकातील किनाऱ्यावरील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
एएनआयनुसार ANI सी.एस. पाटील यांनी माहिती दिली, "संपूर्ण कर्नाटक राज्यात १३ ते १७ जून दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर कन्नड, उडुपी, दक्षिण कन्नड, शिवमोगा आणि चिकमगलूर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी १३ ते १७ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे." तसेच बेंगळुरू येथे येत्या दोन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही सी.एस. पाटील म्हणाले आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की मान्सूनने उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील काही भाग वगळता देशाच्या जवळजवळ सर्व भागात दहा दिवसांच्या आत प्रवेश केला आहे.
रविवारी, मान्सूनने मध्य प्रदेश, संपूर्ण छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार, पूर्व उत्तर प्रदेशातील बहुतेक भाग आणि पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग, संपूर्ण उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि उत्तर हरियाणा, चंदीगड आणि उत्तर पंजाबचा काही भागात प्रवेश केला आहे. IMD issues Red and Orange Alert for these States
हे देखील पहा -
आयएमडीने म्हटले आहे की, पावसाची उत्तर सीमा NLM दीव, सूरत, नंदुरबार, भोपाळ, नॉवोंग, हमीरपूर, बाराबंकी, बरेली, सहारनपूर, अंबाला आणि अमृतसर येथून जात आहे. येत्या काही तासांत नैऋत्य मान्सून पूर्वप्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबचा काही भाग आणि उर्वरित भागांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
१ जूनपासून देशभरात २५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ३६ उपविभागांपैकी १२ मध्ये 'मोठ्या प्रमाणात जास्त' म्हणजेच (सामान्यपेक्षा 60 टक्के जास्त), १० मध्ये नोंदवला गेला 'जास्त' म्हणजेच (20 टक्क्यांपासून ते ५९ टक्क्यांपर्यंत) आणि इतर नऊ मध्ये 'सामान्य' म्हणजेच (-१९ टक्के ते १९ टक्के) असा पाऊस नोंदवला गेला आहे. ५ जुलै पर्यंत मान्सूनने राजस्थानचा काही भाग वगळता देशातील सर्व भाग व्यापण्याची शक्यता आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.