बातमी मागची बातमी

गनिमी काव्यानं बेळगावात घुमला मराठी हुंकार! पाहा कसा फडकला भगवा

साम टीव्ही

बेळगावात पुन्हा मराठी हुंकार घुमलाय. कन्नडिगांच्या मुजोरीला जशास तसं उत्तर देत सीमाबांधवांनी बेळगावात पुन्हा भगवा फडकवलाय.

कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बेळगावमध्ये जाऊन भगवा ध्वज फडकवण्याची घोषणा केली आणि सीमाभागातलं वातावरण एकदम तणावग्रस्त बनलं..काही दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने संघटनेचा ध्वज बेळगाव महापालिकेसमोर लावला होता. कन्नडिगांच्या या कृतीचा निषेध करत कन्नडिगांचा ध्वज त्वरित काढावा या मागणीसाठी आज बेळगावात मोठा मोर्चा निघणार होता. मात्र कर्नाटक पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठिय्या दिला.

कोल्हापुरातून चंदगडमार्गे हे शिवसैनिक बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करत असतानाच बेळगाव पोलिसांनी त्यांना सीमेवर रोखलं. 

बेळगावच्या सर्वच सीमांवर पोलिसांनी नाकेबंदी केली होती. मात्र कानडी पोलिसांच्या हातावर तुरी देत शिवसैनिकांनी गनिमी कावा साधत बेळगावाच्या हद्दीत प्रवेश केला. आणि कोनेवाडीत अखेर भगवा फडकवला..शिवसैनिकांच्या या गनिमी काव्याने कन्नडिगांचा तीळपापड झालाय हे नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : योद्धा शरण जात नाही, म्हणून त्याला बदनाम केलं जातं; अमोल कोल्हे

Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

Avneet Kaur : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

SRH vs LSG,IPL 2024: हैदराबाद- लखनऊमध्ये रंगणार काँटे की टक्कर! या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Dhule News : उपमुख्यमंत्री फडणवीसांना कोळी समाजाने दाखविले काळे झेंडे; १० वर्षानंतरही आश्वासन पूर्तता न केल्याने केला निषेध

SCROLL FOR NEXT