महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागात सध्या भरती सुरु आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागात गट ब, गट क आणि गट ड या संवर्गातील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. लघुलेखक, निम्नश्रेणी, वरिष्ठ लेखक, संरक्षण अधिकारी अशा अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागातील या भरतीबाबत जाहिरात अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. १०वी, १२वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे. (Government Job)
महाराष्ट्र राज्य सरकारअंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. १०वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १६,६०० ते ५२,४०० रुपये पगार मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागातील या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.२३६ रिक्त पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०२४ आहे. (Women And Child Development Department Recruitment)
सध्या एआय एअरपोर्ट सर्व्हिसेजमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. हँडीमॅन आणि यूटिलिटी एजेंट्स या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकर करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Mahila Va Balviakas Bharti)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.