UCO Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

UCO Bank Recruitment: युको बँकेत ५४४ शिकाऊ पदांसाठी भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

UCO Bank Recruitment 2024: युको बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. युको बँकेत ५४४ शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. युको बँकेत शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. युको ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये लोकप्रिय बँक आहे. युको बँकेने देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाखांमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती सुरु केली आहे. यासाठी बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे.

युको बँकेने २ जुलै रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. ५४४ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि ओडिशासाठी जागा भरण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ८५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशसाठी ४७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर ओडिशामध्ये ४४ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

ज्या उमेदवारांना युको बँकेत अपरेंटिस पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ucobank.com या वेबसाइटवरील लिंकवरुन तुम्ही याबाबतची सूचना पाहू शकतात. त्यानंतर वेबसाइटच्या मुखपृष्ठावर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी १४ जुलैआधी अर्ज करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

युको बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार,या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय २०-२८ वयोगटातील असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी वयोमर्यादेत सूट दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT