Thane Mahapalika Bharti 2025 Saam Tv
naukri-job-news

Thane Mahapalika Bharti 2025: खुशखबर! ठाणे महानरपालिकेत सर्वात मोठी भरती; १७७३ रिक्त पदे; पगार १ लाखांपेक्षा जास्त; जाणून घ्या

Thane Municipal Corporation Recruitment: ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ठाणे महापालिकेत १७७३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

ठाणे महापालिका भरती

१७७३ पदांसाठी होणार भरती

सरळसेवा परीक्षेद्वारे करण्यात येणार निवड

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ठाणे महानगरपालिकेत सर्वात मोठी भरती निघाली आहे. ठाणे महानगरपालिकेत १७७३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आसी आहे. ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ही भरती सरळसेवा प्रवेशाने होणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिकेत भरती (TMC Recruitment)

ठाणे महापालिकेत प्रशासकीय सेवा,लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा या सवांमधील पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आले आहे.

Thane Mahapalika Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? (Thane Municipal Corporation Recruitment)

ठाणे महापालिकेत एकूण १७७३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून म्हणून १२ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्ही www.thanecity.gov.in या वेबसाइटवर जाऊन करु शकतात.

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. ऑनलाइन परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर www.thanecity.gov.in दिली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा, प्रवेशपत्र याचीही माहिती ऑनलाइन मिळणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती

सहायक परवाना निरीक्षक, टंकलेखक, लिपीक लेखा, अभियंता, प्रदूषण निरीक्षक, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, फायरमन, उपचार तज्ञ, मानसोपचार तज्ञ, परिचारिका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरेपिस्ट. फिजिसिस्ट, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धोकादायक पाच मजली इमारत पाडली, प्रकरण काय? पाहा व्हिडिओ

Mukesh Ambani: मोठी बातमी! मुकेश अंबानींना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची धमकी

Maharashtra Live News Update: रायगडमधील ध्वजारोहण आदित्य तटकरेंच्या हस्ते होणार

Nashik News: शिंदे गटाच्या बैठकीत तुफान राडा, पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडत शिवीगाळ; पाहा VIDEO

INDIA Alliance Protest: विरोधकांच्या मोर्चादरम्यान महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या, घोषणाबाजी करताना दोघी चक्कर येऊन पडल्या

SCROLL FOR NEXT