SBI Job Saam Tv
naukri-job-news

SBI Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; ज्युनिअर असोसिएट पदासाठी भरती, अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत ज्युनिअर असोसिएट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हीही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर असोसिएट पदासाठी भरती करण्यात येणार आहे. कस्टमर सपोर्ट अँड सेल्स विभागात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (State Bank Of India Recruitment)

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. त्यासाठी तुम्ही https://bank.sbi/web/careers/current-opening वर जाऊन लॉग इन करा.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज करावेत.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. प्रिलियम्स परीक्षा जानेवारी आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (SBI Recruitment)

स्टेट बँकेतील नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

स्टेट बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना sbi.co.in या साइटवर क्लिक करा. त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्यानंतर त्यात फोटो, सही आणि स्कॅन केलेला फोटो अपलोड करा. यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागणार आहे. यानंतर फॉर्म सबमिट करा.

वनविभागात भरती (Forest Department Bharti)

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर वनविभागात सध्या भरती सुरु आहे. वनविभागात पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. १०वी, १२वी, पदवीधर आणि आयटीआय पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. वनविभागात जल प्रकल्प मदतनीस ते डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT