SAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार दीड लाख रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

SAI Recruitment 2025: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. हेड कोच पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

तुम्हाला खेळाची आवड आहे अन् आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये हेड कोट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट- लीड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही sportsauthorityofindia.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये हेड कोच (बॉक्सिंग), हेड कोच (जुडो), स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग (मल्टी डिसिप्लिन) पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

एसएआयमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १,००,००० ते १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित स्पोर्ट्समध्ये डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत १० वर्षांचा अनुभव असायला हवा.

या नोकरीबाबत अर्जाचा नमुना हा अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. हा नमुना डाउनलोड करुन तो पूर्ण भरावा. त्यानंतर निदेशक, खेळ आणि युवा व्यव्हार संचलनालय, जिमी जॉर्ज इंडोर स्टेडियम, तिरुवनंतपुरम, केरळ येथे पाठवायचा आहे.

बँक ऑफ इंडिया भरती

सध्या बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

Kharat case : ४५ राजकीय नेते खरातच्या दररोज संपर्कात, शिंदे-शेलारांचं लग्नाच्या पत्रिकेत नावं, कोडवर्डनं नंबर सेव्ह

आधी बलात्कार आता अवैध शस्त्रसाठा; प्रसिद्ध रील स्टार निघाला गँगस्टर

Beed Crime : मला खूप मारले, बदनाम केलं..; प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

भोंदू खरातनंतर आता तलवार बाबाला बेड्या, पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT