SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ४५००० रुपये; पात्रता अन् अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे.

Siddhi Hande

बँकेत सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत FLC काउंसलर आणि FLC डायरेक्टर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (SBI Recruitment)

स्टेट बँकेत २६९ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे. (State Bank of Recruitment 2025)

स्टेट बँकेच्या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी क्लेरिकल पदासाठी ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. जेएमजीएस I पदासाठी ४०,००० रुपये पगार मिळणार आहे. एमएमजीएस II या पदासाठी ४५,००० रुपये पगार मिळणार आहे. एमएमजीएस III पदासाठी ४५,००० रुपये पगार मिळणार आहे. तर एमएमजीएस IV पदासाठी ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.

स्टेट बँकेतील नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन वाचा. त्यानंतर स्टेट बँकेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT