SBI Jobs Saam Tv
naukri-job-news

SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची संधी; मिळणार ९३००० रुपये पगार; पात्रता काय?

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. १५११ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

चांगल्या पगाराची नोकरी सर्वांनाच हवी असते. त्यात सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १५११ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. (SBI Jobs)

स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदामध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग पदवी (B.E/B.Tech)/MCA/M.tech पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

२१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० रुपये ते ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे.तुम्ही www.sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (State Bank Of India Recruitment)

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी (BMC Job)

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतदेखील भरती सुरु आहे. ग्रुप सी इन्स्पेक्टर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांना ९२००० रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठीही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT