District Co-Operative Bank Saam Tv
naukri-job-news

District Co-Operative Bank: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध पदांसाठी भरती; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

District Co-Operative Bank Recruitment: जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी, १२वी ते पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. तब्बल ३२३ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. शिपाई आणि ज्युनियर लिपिक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. १०,००० ते १४००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. लिपिक पदासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. याचसोबत त्याने एमएससीआयटीचा कोर्स केलेला असावे. शिपाई पदासाठी उमेदवार १०वी पास असायला हवा. तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असायला हवे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. याबाबत माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्य अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. २१ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

याचसोबत अनेक बँकांमध्ये भरती सुरु आहे. आयबीपीएसद्वारे नॅशनल बँकामध्ये भरती केली जाणार आहे. लिपिक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे. या नोकरीसाठी इच्छुकस उमेदवारांनी लवकरात लवकर आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT