SAIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

SAIL Recruitment: सरकारी नोकरीची संधी, SAIL मध्ये भरती; पगार १,८०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

SAIL Recruitment 2025: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. SAIL म्हणजे स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट/जीडीएमओ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला sailcareers.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी भरती वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.हा इंटरव्ह्यू २३ जुलै २०२५ रोजी होणार आहे. सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत रिपोर्ट करणे आवश्यक आहे.

पात्रता (SAIL Eligibility)

सेलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा पीजी डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत इतर पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६९ वर्षे निश्चित करण्यात आलं आहे.

पगार (Salary)

स्पेशलिस्ट/ GDMO पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. जीडीएमओ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९०,००० ते १,००,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती १ वर्षासाठी होणार आहे. यानंतर हा कालावधी वाढवला जाऊ शकतात. नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाणार आहे. इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो, जन्म प्रमाणपत्र, इंटर्नशिप प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, वोटर आयडी, आधार कार्ड हे कागदपत्र घेऊन जायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT