Govt Jobs Saam Tv
naukri-job-news

Govt Jobs : कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; तब्बल ३०० पदांसाठी भरती; पात्रता आणि अटी काय? वाचा

SAIL Recruitment 2024: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची चांगली संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेले तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. ३०० पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये अर्ज करण्याची सुरुवात १८ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. याबाबत सर्व माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांना कामाचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. तुम्ही sailcareers.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ट्रेड, टेक्निशियन, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. ३५६ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी १६५ पदे रिक्त आहेत. टेक्निशियन पदासाठी १३५ जागा रिक्त आहेत तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ५३ जागा रिक्त आहेत. एकूण ३५६ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आयटीआय परीक्षा पास केलेली असावी. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी बीई/बीटेक ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात.

१८ ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. मेरिट बेसवर उमेदवारांची निवड केली जाईल. या नोकरीसाठी उमेदवारांनी स्टायपेंड दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पतंग उडवताना इलेक्ट्रिक शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

Contrast Saree Blouse : साडीसोबत घाला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज; सणासुदीला मिळेल परफेक्ट लूक, सगळेच म्हणतील WOW

SCROLL FOR NEXT