Railway Recruitment Saam tv
naukri-job-news

RRB Recruitment 2025: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

Railway RRB Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सेक्शन कंट्रोलर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने सेक्शन कंट्रोलर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. कालपासून म्हणजेच १५ सप्टेंबरपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (Railway Recruitment 2025)

रेल्वे बोर्डाने rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्यास सांगितले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करावेत. याचसोबत फी जमा करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२५ आहे.

रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २० ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

सर्वात आधी तुम्हाला rrbapply.gov.in वर जायचं आहे.

यानंतर अकाउंट क्रिएट करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करा.

यानंतर लॉग इन करुन इतर माहिती भरा.

यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.

अर्जाचे शुल्क

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. यामध्ये निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT