रेल्वेत नोकरी करण्याची संधी
६५६५ पदांच्या भरतीसठी रेल्वेकडून मंजुरी
लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार
रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या भरतीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. २०२६ मध्ये टेक्निशियन पदासाठी ६५६५ पदे भरली जाणार आहेत. यासाठी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून हे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
रेल्वेत नोकरीची संधी
रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे आणि युनिट्सना मंजुर रिक्त पदांची माहिती एका आठवड्याच्या आत OIRMS मध्ये सादर करायची आहे. जेणेकरुन केंद्रीय रोजगार अधिसूचनेवर काम करेल. आरआरबी बंगळुरु या भरती प्रक्रियेत मदत करेल. या भरती प्रक्रियेद्वारे रिक्त पदे भरली जाणार आहेत. लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
यामध्ये वेगवेगळ्या विभागांसाठी भरती केली जाणार आहे. मध्य रेल्वेसाठी सर्वाधिक पदे भरली जाणार आहे. एकूण ८७० पदांसाठी मंजुरी दिली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेसाठी १६९ पदे, पूर्व मध्य रेल्वेसाठी १८६ पदे भरण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेसाठी ५४४ तर पश्चिम मध्य रेल्वेसाठी २३१ पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता (Eligibility)
रेल्वेतील ही भरती टेक्निशियन पदांसाठी होणार आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई./बी.टेक केलेले असावे, अभियांत्रिकी पदवी, बी.एस्सी पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निशियन ग्रेड-II पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावी. याचसोबत पीसीएमसह १२वी उत्तीर्ण असावी. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी १८-३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.