Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी;४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती;पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत तब्बल ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत सध्या ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वेत ४००० अप्रेंटिस पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. तुम्ही www.scr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (Railway Recruitment 2025)

रेल्वेतील ही भरतीप्रक्रिया विविध ट्रेड्समधील अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. यामध्ये एअर कंडिशनिंग, कारपेंटर, डीझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, वेल्डर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित विषयात आयटीआय केलेले असावे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष असावे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७,७०० ते २०,२०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. १०वी आणि आयटीआयला मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (Railway Jobs)

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही scr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? गौतमीच्या कारमध्ये राजकीय नेता कोण?

Ramdas Kadam: रामदास कदमांची बायको जळली की जाळली? 1993 च्या प्रकरणावरुन कदमांची कोंडी?

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT