Railway Recruitment Saam tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल १११२७ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

RRB ALP Bharti 2026: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची संधी

असिस्टंट पायलट पदासाठी भरती

अर्ज कधी आणि कसा करावा?

रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता तुमच्याकडे आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण १११२७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या भरतीबाबत याआधीच माहिती दिली होती.

रेल्वेच्या शॉर्ट नोटिफिकेशननुसार, या भरतीची अर्जप्रक्रिया १५ मेपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी या कालावधीत अर्ज करायचा आहे.

रेल्वे एएलपी भरती २०२६ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे असावे. याचसोबत आयटीआय पास असणे अनिवार्य आहे. या नोकरीसाठी इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. इंजिनियरिंग पदवीप्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

रेल्वेतील या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना वाचा.

रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ५०० रुपये शुल्क भरायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

विविध रेल्वे विभागात ही भरती केली जाणार आहे. मध्य रेल्वेत १४०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. पूर्व मध्य रेल्वेत ७००, पूर्व तटीय रेल्वेत १६२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. संपूर्ण देशात वेगवेगळ्या रेल्वे झोनमझध्ये भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट १, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट २ परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाते. यानंकर मेडिकल टेस्ट केली जाणार आहे.यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची फायनल यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT