Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या लेव्हल १ आणि लेव्हल २ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ईस्टर्न रेल्वेत भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती सेलने या नोकरीसाठी ही भरती जाहीर केली आहे. ईस्टर्न रेल्वेने लेव्हल १ आणि लेव्हल २ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ईस्टर्न रेल्वेत नोकरी करण्यासाठी तुम्ही rrcer.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ९ जुलैपासून सुरु होणार आहे.

रेल्वेतील या भरती मोहिमेत एकूण १३ जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ८ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. रेल्वेत लेवल २ पदांसाठी ३ पदे भरती केली जाणार आहेत. लेव्हल १ पदांसाठी १० पदे भरली जाणार आहेत.

लेव्हल २ पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांना पात्रतेत सूट मिळणार आहे. याचसोबत उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. NCVT मधून मान्यता प्राप्त राष्ट्रीय शिक्षुता प्रमाणपत्र (NAC) किंवा ITI केले असावे.

लेव्हल १ पदासाठी कोणत्याही बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत NCVT मधून आयटीआय किवा NAC प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये भरावे लागतील. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. परीक्षेत पा झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी त्यानंतर उमेदवारांना निवडले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT