Railway Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल १० हजार ८४४ जागांसाठी मेगाभरती, वयाची अट काय?

Railway Recruitment 2024: तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये तब्बल १० हजार ८४४ पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये या वर्षी मोठी भरती करण्यात येणार आहे. १२ वी पास आणि पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एकूण १० हजार ८४४ पदांसाठी ही मेगाभरती होणार आहे. याबाबत अधिक माहिती तुम्हाला रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.

२०२४ या वर्षासाठी ही भरती करण्यात येणार आहे. लवकरच ही भरतीप्रक्रिया सुरु होणार आहे.ज्या उमेदवारांकडे पदानुसार आवश्यक पात्रता आहे ते उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी रिक्त पदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी १० हजारहून अधिक जागांसाठी भरती केली जाणार आहे. तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. याबाबतची अधिसूचना रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या नोकरीमध्ये अंडर ग्रॅज्युट पदे ही ३ हजार ४०४ असणार आहेत.ग्रॅज्युएट पदे ही ७ हजार ४८७ इतकी असणार आहेत.पदव्युतर आणि पदवीधर पदांसाठी १२ वी उत्तीर्ण प्रथम आणि पदवीधर उमेदवार द्वितीय अर्ज करु शकतात.यूजी पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३३ असणार आहे.

रेल्वेच्या या भरतीप्रक्रियेची तारीख अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर पश्चिम रेल्वेत पदभरती सुरु आहे. मेडिकल प्रोफेशनल पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT