Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: पंजाब अँड सिंध बँकेत ऑफिसर होण्याची संधी; अर्ज कुठे आणि कसा करावा?

Punjab And Sind Bank Recruitment 2025: पंजाब अँड सिंध बँकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत सध्या लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब अँड सिंध बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पंजाब अँड सिंध बँकेतील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २० ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. punjabandsindbank.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

पात्रता (Punjab And Sind Bank Recruitment Eligibility)

पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि संस्थेतून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.याचसोबत उमेदवाराकडे पब्लिक सेक्टर, बँक, रीजनल रुरल बँकेत ऑफिसर कॅडरमध्ये १८ महिन्याचा काम करण्याचा अनुभव असावा.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते ३० वयोगटातील असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ऑगस्ट १९९५ ते १ ऑगस्ट २००५ मध्ये झालेला असावा. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

अर्जप्रक्रिया (Application Process)

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ibpsonline.ibps.in/psbaug25 या वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर तुम्हाला Click here for New Registration वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला सही आणि फोटो अपलोड करायचा आहे.

यानंतर शुल्क जमा करा आणि फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT