Appointment of those Candidates Recommended by MPSC Cancelled SaamTV
naukri-job-news

Pune News: मुदतवाढ देऊनही गैरहजर, MPSCने शिफारस केलेल्या 'त्या' उमेदवारांची नियुक्ती रद्द

Appointment of those Candidates Recommended by MPSC Cancelled: आता नियुक्ती केलेल्या १६४ उमेदवारांपैकी व मुदतवाढ दिलेल्या १८ उमेदवारांपैकी एकूण ४५ उमेदवारांनी त्यांना दिलेल्या कालावधीत नियुक्ती स्वीकारली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी दिलेल्या मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण १६४ पदांसाठी दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा २०२४च्या अंतिम निकालाच्या आधारे आयोगाने शिफारस केलेल्या १६४ उमेदवारांची या विभागाच्या मंत्रालयीन विभागात / महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी १० डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

सरळसेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा २०२३ मधून नियुक्त झालेल्या १८ उमेदवारांनी केंद्र/राज्य शासनाच्या सेवेत अगोदरच कार्यरत असल्यामुळे पदावर रुजू होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती केली होती. अशा १८ उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी ९ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढही देण्यात आली. नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या ३० दिवसांच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास किंवा दिलेल्या कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा वाढीव कालावधीत रुजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आता नियुक्ती केलेल्या १६४ उमेदवारांपैकी व मुदतवाढ दिलेल्या १८ उमेदवारांपैकी एकूण ४५ उमेदवारांनी त्यांना दिलेल्या कालावधीत नियुक्ती स्वीकारली नाही, त्यामुळे त्या ४५ उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT