पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी
ज्युनिअर इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर
अर्जप्रक्रिया जाणून घ्या.
पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पुणे महानगरपालिकेत ज्युनिअर इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation Recruitment) विविध विभागात इंजिनियर पदासाठी भरती केली जाणार आहे. १६९ पदांसाठी भरती जाहीर केली आहे.त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत. १ ऑक्टोबरपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे.
महापालिकेने याआधीच ही भरती जाहीर केली होती. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली होती. मात्र, यावेळी ही प्रक्रिया रखडणार नाही. याची काळजी घेतली आहे. आचारसंहितेपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा पुणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
अर्जप्रक्रिया
पुणे महापालिकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करताना तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे अपलोड करायची आहे.
पुणे महापालिकेने याआधीही ही भरतीप्रक्रिया राबवली होती. गेल्या काही वर्षांत महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी भरती मोहिमेत अनेक रिक्त जागा ठेवल्या होत्या. मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी पुणे महापालिका नेहमी भरती जाहीर करत असते. दरम्यान, यंदाही ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.