Pune Air Force School Recruitment Saam Tv
naukri-job-news

Pune Air Force School Recruitment: पुण्यातील एअर फोर्स स्कूलमध्ये शिक्षक पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Pune Air Force School Recruitment 2024: पुण्यातील एअर फोर्स स्कूलमध्ये भरती सुरु आहे. शिक्षक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर प्राप्त होईल.

Siddhi Hande

ज्या तरुणांना एअर फोर्समध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पुण्यातील एअर फोर्स स्कूलमध्ये नोकरीची संधी आहे. या स्कूलमध्ये दोन शिक्षक पदासाठी भरती सुरु आहे. स्पेशल एज्युकेटर म्हणजेच विशेष शिक्षक आणि गणित या विषयासाठी आणि पीजीटी या पदासाठी रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे. स्पेशल एज्युकेटर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२४ आहे.

पुण्यातील एअर फोर्स स्कूलमध्ये भरती केल्या जाणाऱ्या शिक्षकांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. २१ ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. मास्टर्स, बॅचलर्स, बीएड, पीजी डिप्लोमा शिक्षण झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणकाविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना recruitmentatafsvn@gmail.com यावर मेल करायचा आहे. नोकरीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.याबाबत सर्व माहिती एअर फोर्स स्कूलच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवाराला २८,५०० रुपये मासिक वेतन दिले जाईल. या नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. त्यामुळे पुण्यात राहणाऱ्या रहिवाशांनी किंवा तिथे काम करण्याची तयारी असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी www.airforceschoolpune.ac.in ला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

SCROLL FOR NEXT