Prasar Bharati Recruitment saam tv
naukri-job-news

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Prasar Bharti Jobs Vacancy 2026: प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती

एमबीए पदवीधरांसाठी नोकरीची संधी

सरकारी कंपनीत नोकरी करायची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहेत. भारतातील पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टर म्हणजेच प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग विभागात काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी तुम्ही prasarbharati.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

विविध शहरांमध्ये भरती

प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती रायपुर, जालंधर, पाटणा, मुंबई, भोपाळसह अनेक ठिकाणी होणार आहे. देशातील अनेक दूरदर्शन केंद्र, आकाशवाणी किंवा कमर्शियल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसमध्ये भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी १५ दिवसात अर्ज करायचे आहेत.

पगार

प्रसार भारतीमध्ये एकूण १४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी भरती दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. या नोकरीसाठी चैन्नई, हैदराबाद, मुंबई, कोलकत्ता येथे निवड झाल्यावर ३५००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे. इतर शहरांसाठी भरती झाल्यावर ३५,००० ते ४२००० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए, एमबीए मार्केटिंग किंवा पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणा्या उमेदवाराला कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E20 Fuel Protest : मोठी बातमी! GEN G नंतर आता आणखी एक आंदोलन; E 20 वरून सरकारला घेरणार, या ६ मागण्या केल्या

कल्याणमधील गांधारी पुलाची दयनीय अवस्था! दररोज वाहतूक कोंडी; पावसात खड्ड्यांचा अंदाज येईना

Maharashtra News Live Update: अकोल्यात पीडित मुलीच्या मृतदेहासह रस्ता रोको; आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेची मागणी

Actress Breast Cancer: ज्येष्ठ अभिनेत्रीने स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे लपवले, कारण सांगत म्हणाल्या, 'काम मिळण्यासाठी...'

Skin Problems Alert : चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसणारी 'ही' चिन्हं असू शकतात धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT