PGCIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

PGCIL Recruitment: खुशखबर! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार मिळणार १,२०,००० रुपये; आजच अर्ज करा

PGCIL Recruitment 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. फिल्ड इंजिनियर आणि सुपरवाइजर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

PGCIL मध्ये १५४३ पदांसाठी भरती

फील्ड इंजिनियर आणि सुपरवाइजर पदासाठी केली जाणार भरती

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पीजीसीआयएल म्हणजेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. पीजीसीआयएलमध्ये फील्ड इंजिनियर आणि सुपरवायजर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

PGCIL भरती

पीजीसीआयएलमध्ये १५४३ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी तु्म्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्हाला https://www.powergrid.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

पीजीसीआयएलमध्ये इंजिनियरिंग केलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. बीई/ बीटेक किंवा बीएससी इंजिनियरिंग केलेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरती मोहिमेत सिविल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन ब्रँचमधून इंजिनियरिंग केलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

PGCIL मध्ये फिल्ड इंजिनियर पदासाठी ५३२ जागा रिक्त आहेत. सिविल फिल्ड इंजिनियर पदासाठी १९८ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल फिल्ड सुपरवायजर पदासाठी ५३५ जागा तर सिविल फिल्ड सुपरवायजर पदासाठी १९३ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन फिल्ड सुपरवाइजरसाठी ८५ जागा रिक्त आहेत.

फील्ड इंजिनियिर पदासाठी उमेदवारांनी संबंधित इंजिनियरिंग स्ट्रीममध्ये बीई/बीटेक/ बीएससी इंजिनियरिंग केलेले असावे. फील्ड सुपरवायजर पदासाठी इंजिनियरिंगमध्ये फुल टाइम डिप्लोमा केलेला असावा.

पगार

फील्ड इंजिनियर पदासाठी ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. फील्ड सुपरवाइजर पदासाठी २३००० ते १,०५,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत विविध भत्तेदेखील दिले जाणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. तुम्ही अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना वाचावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT